esakal | Covid Vaccine : कोरोनावर मात करण्यासाठी माजी मुख्यमंत्र्यांनी घेतली कऱ्हाडात 'लस'
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरोनाची लस घेतली.

Covid Vaccine : कोरोनावर मात करण्यासाठी माजी मुख्यमंत्र्यांनी घेतली कऱ्हाडात 'लस'

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम सुरू आहे. कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरोनाची लस घेतली. कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, प्रांताधिकारी उत्तमराव दिघे यांच्या उपस्थितीत कोरोना लस त्यांना देण्यात आली. 

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत त्यांचे बंधू अधिकराव चव्हाण आणि त्यांचे केअर टेकर नामदेव चन्ने अशा तीन जणांना लस देण्यात आली. लस घेतल्यानंतर त्यांना 30 मिनिटं निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. दुसरी लस 28 दिवसांनी दिली जाईल.

बातमी कामाची! घरबसल्या जातीचे प्रमाणपत्र कसे मिळवाल?; जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर

यावेळी आमदार चव्हाण यांच्यासोबत मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नगरसेवक राजेंद्र माने, राहुल चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी आमदार चव्हाण यांनी कोविड लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस करीत लसीकरण केंद्राची पाहणी केली व अधीक्षक शिंदे यांच्याकडून कोविड लसीकरणाची आत्तापर्यंतची माहिती जाणून घेतली.

दुधेबावीत भवानीआई डोंगरात वणव्याचा भडका; वन विभागाने लावलेली अनेक झाडे जळून खाक

How’s The Josh : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मेढ्यातल्या दोन भावांची भारतीय नौदलात निवड

सातारकरांनाे! कोरोना चाचणीपासून ते प्लाझ्मा मिळण्यापर्यंतची महत्वाची माहिती जाणून घ्या एका क्लिकवर 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top