esakal | गंभीर परिस्थिती! साताऱ्यात रक्ताचा तुटवडा; जिल्ह्याला दररोज 100 बाटल्यांची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

जिल्ह्यातील जनता सध्या कोरोनाशी मुकाबला करत आहे. गेल्या वर्षभर कोरोनामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत.

गंभीर परिस्थिती! साताऱ्यात रक्ताचा तुटवडा; जिल्ह्याला दररोज 100 बाटल्यांची गरज

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : कोरोनाशी मुकाबला करताना कोरोना लशीच्या तुटवड्यासोबत आता जिल्ह्यातील रक्तपेढीतही विविध रक्त गटांच्या रक्ताचाही तुटवडा जाणवत आहे. विविध अपघात, शस्त्रक्रिया, बाधित रुग्ण, थॅलसिमिया आदी रुग्णांसाठी दिवसाकाठी 100 बाटल्या रक्त लागते; परंतु कोरोनामुळे रक्त संकलन शिबिरांना अल्प प्रतिसाद मिळत असल्याने जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यासाठी आता रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करणे आवश्‍यक आहे. 

जिल्ह्यातील जनता सध्या कोरोनाशी मुकाबला करत आहे. गेल्या वर्षभर कोरोनामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. कोरोनाबाधितांना कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा देऊनही जीव वाचविता येऊ शकतो; पण सध्या जिल्ह्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. यासाठी सर्वपातळीवरून रक्तदान करण्याचे आवाहन केले जात आहे. जिल्ह्यात सात ते आठ रक्तपेढ्या असून, जिल्हा रुग्णालय व कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालयातही रक्तपेढी आहेत. जिल्ह्यात दररोज सुमारे 100 बाटल्या रक्ताची मागणी विविध कारणांतून होते. 

Corona Virus शनिवार आणि रविवारीच बाहेर येतो का?; खासदार उदयनराजेंचा सरकारला सवाल

यामध्ये विविध अपघातात गंभीर जखमी व्यक्ती, विविध शस्त्रक्रिया, बाधित रुग्ण, थॅलसिमियाचे रुग्ण, डायलेसिस यासाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची मागणी होते. वेळेत रक्त मिळाले तर रुग्णांचा जीव वाचू शकतो; पण सध्या रक्तपेढ्यात सर्व प्रकारच्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या विविध संस्थांनी रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान शिबिर घेतली आहेत. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या महाविद्यालये बंद असल्याने मोठ्या प्रमाणात होणारी रक्तदान शिबिरे होत नाहीत, तसेच कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकही रक्तदानासाठी पुढे येण्यास धजावत नाहीत. अशा वेळी विविध संस्था व व्यक्तींच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे घेऊन हा तुटवडा भरून काढला जात आहे. त्यासाठी आता तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे. 

सातारकरांनो, काळजी घ्यावीच लागेल! ‘Oxygen Bed’ शिल्लकच नाहीत; जाणून घ्या बेडची संख्या..

प्लाझ्मा देणाऱ्यांचे प्रमाणही अल्प 

कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपीही उपयुक्त ठरत आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा घेऊन तो बाधित रुग्णांच्या शरीरामध्ये सोडला जातो. जेणे करून बाधित रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडी जाऊन तो कोरोनाच्या विषाणूशी प्रतिकार करू शकतो. सध्या जिल्ह्यात प्लाझ्मा देणाऱ्यांचे प्रमाणही अल्प आहे. काही जण आपल्या नातेवाइकांसाठी असा प्लाझ्मा दान करतात; पण सामाजिक दृष्टिकोन विचारात घेऊन कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. 

Video पाहा : बेड, रेमडिसिव्हर, औषधांचा तुटवडा भासणार नाही; जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top