राजकीय गट-तट बाजूला ठेऊन खटाव-पुसेगावचा विकास साधणार : आमदार शशिकांत शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

खटाव-पुसेगाव जिल्हा परिषद गटांत नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने चांगले यश संपादन केले आहे.

राजकीय गट-तट बाजूला ठेऊन खटाव-पुसेगावचा विकास साधणार : आमदार शशिकांत शिंदे

विसापूर (जि. सातारा) : माजी पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे शेतकरी व कष्टकरी जनतेचे खरे कैवारी आहेत. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विकासकामे करताना राजकीय गट-तट न पाहता सर्वसामान्य जनता विकासाचा केंद्रबिंदू मानून पाणीपुरवठा योजना, रस्ते, सिमेंट बंधारे, आरोग्य, साकव पूल यांसह विविध प्रश्न सोडवण्याची क्षमता त्यांच्यात आहे, असे मत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी व्यक्त केले. 

दरुज (ता. खटाव) येथील विविध विकासकामांच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार शशिकांत शिंदे होते. या वेळी सातारा राष्ट्रवादी लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सागर साळुंखे, माजी उपसभापती संतोष साळुंखे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, राजेंद्र कचरे, आनंदराव भोंडवे, अर्जुन वलेकर, हणमंत मोरे, रामचंद्र शिंदे, चंद्रकांत शिंदे, बाळासाहेब जाधव, मधुकर जाधव, आनंदराव लावंड, सरपंच नंदा खामकर, ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. 

एकदम झक्कास! आता वेळेत कर भरणाऱ्यांना मिळणार वॉटर एटीएम कार्ड मोफत

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, "दरुजमधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या रस्त्यांना व साकव पुलांना लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे येथील शेतकऱ्यांचा व लोकांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. खटाव व पुसेगाव जिल्हा परिषद गटांत नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने चांगले यश संपादन केले आहे. येत्या काळात विकासकामांत झुकते माप देण्याचा प्रयत्न राहील.'' सागर साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या कायदेशीर सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल ऍड. किसन खामकर व तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सोमनाथ पाटोळे यांचा सत्कार करण्यात आला. ऍड. खामकर यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच रोहित लावंड यांनी सूत्रसंचालन केले. मनोहर लावंड यांनी आभार मानले. 

आमचा गावमधून कुडाळचा कायापालट करणार; उपसभापती सौरभ शिंदेंची ग्वाही

महाराष्ट्र दिनापासून पात्र प्रकल्पग्रस्तांना सांगली, साताऱ्यातील जमिनींचे वाटप करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top