esakal | खवय्यांनो खुशखबर! साताऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांची मटण, चिकनच्या दुकानांना परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी 30 एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाउनमध्ये सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

खवय्यांनो खुशखबर! साताऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांची मटण, चिकनच्या दुकानांना परवानगी

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : मिनी लॉकडाउनच्या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी बदल केला असून, अत्यावश्‍यक बाबींमध्ये मटण, चिकन व मासे यांचा समावेश केला आहे. त्यामुळे ही दुकाने आता सकाळी आठ ते सायंकाळी सात या वेळेत सुरू राहणार आहेत. वित्त संस्थेशी संबंधित सर्व कार्यालये, वकिलांची कार्यालये, सेतू कार्यालये, नॉन बॅंकिंग व वित्तीय महामंडळे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पेट्रोलियम उत्पादने, फळांची दुकाने, खासगी सुरक्षा सेवा, डेटासेंटर व आयटीच्या सेवाही सुरू राहणार आहेत. मात्र, मेडिकल शॉप्स रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी 30 एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाउनमध्ये सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या सूचनेच्या आधारे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काही बाबींचा अत्यावश्‍यक सेवेत समावेश केला आहे. नव्याने अत्यावश्‍यक सेवेत समावेश केलेल्या बाबींमध्ये पेट्रोलियम संबंधित उत्पादने, सर्व प्रकारच्या कार्गो सेवा, डेटा सेंटर, क्‍लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर, माहिती-तंत्रज्ञान संबंधित सुविधा व सेवा, शासकीय व खासगी सुरक्षा सेवा, फळविक्रेते, व्हेटर्नरी हॉस्पिटल व ऍनिमल केअर सेंटर, पेट शॉप्स्‌, अंडी, चिकन, मांस तसेच जनावरांचा चारा आणि इतर आवश्‍यक बाबींचा समावेश असलेली कच्चा माल गोदामे यांचा समावेश करण्यात आला आहे. 

ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे धावडेत साकव पुलाचे काम रखडले; गृहराज्यमंत्री घालणार लक्ष?

रिझर्व्ह बॅंकेशी संबंधित संस्था, प्राथमिक डिलर्स, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टिम ऑपरेटर आणि वित्तीय बाजारातील रिझर्व्ह बॅंकेशी संबंधित संस्था, सर्व नॉन बॅंकिंग वित्तीय महामंडळे, सेबीच्या मान्यताप्राप्त संस्था, सर्व मायक्रो फायनान्स संस्था, सर्व वकिलांची कार्यालये, कस्टम हाऊस एजंट, लस, औषधे व जीवरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक या बाबी आठवड्यातील सर्व दिवशी सकाळी सात ते सायंकाळी आठ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. बस, ट्रेन व विमानातून प्रवास करणाऱ्यांना स्थानकापासून घरापर्यंत तिकिटाच्या आधारावर प्रवास करण्यास मुभा राहणार आहे. 

कोरोनाचा उद्रेक! गावोगावच्या ग्रामसुरक्षा समित्या झाल्या निष्क्रीय; प्रशासनाच्या पुढाकाराची गरज

औद्योगिक कामगारांना खासगी वाहनांच्या आधारे सोमवार ते शुक्रवारपर्यंत दोन्ही शिफ्टमध्ये कामावर जाता येणार आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉल तिकिटाच्या आधारे प्रवास करता येणार आहे. लग्न समारंभासाठी शनिवार व रविवारी परवानगी देण्याची जबाबदारी तहसीलदार किंवा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी कोरोनाचा सूक्ष्म प्रतिबंधित झोन व हॉटस्पॉट वगळून परवानगी द्यावी. तसेच मेडिकलची दुकाने सोमवार ते रविवार या कालावधीत सकाळी सात ते रात्री दहा या वेळेत सुरू राहणार असून, हॉस्पिटलशी संबंधित मेडिकलची दुकाने 24 तास सुरू ठेवता येणार आहेत. 

पुण्याहून साता-याला निघालात, थांबा! खंबाटकी घाटात झालाय माेठा अपघात

सेतू कार्यालये सकाळी नऊपासून 

सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत परवानगी असलेले याप्रमाणे ः अत्यावश्‍यक वस्तूंची विक्रीसाठी मॉल्स, शेती अवजारे व माल वाहतूक वाहन दुरुस्ती उद्योग, बांधकामासाठी आवश्‍यक असणारे साहित्य साईटपर्यंत पोच करणे यांचा समावेश आहे. सेतू कार्यालये मात्र, सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत शुक्रवारपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. 

साता-यात सलग पाचव्या दिवशी काेराेनाचा विस्फाेट; दुस-या लाटेत 922 रुग्णांची भर, पाच बाधितांचा मृत्यू 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top