esakal | माणच्या इतिहासात जास्त दिवस चालणारे म्हसवडात शेतकरी आंदोलन सुरूच!

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

सुमारे दीडशे वर्षांपूर्वीपासून कब्जे वहिवाटीत असलेल्या शेतजमिनी मोठ्या संख्येने शेतकरी कसत आहेत.

माणच्या इतिहासात जास्त दिवस चालणारे म्हसवडात शेतकरी आंदोलन सुरूच!
sakal_logo
By
सल्लाउद्दीन चोपदार

म्हसवड (जि. सातारा) : शेतजमीन कब्जे वहिवाटीत वर्षानुवर्षे असलेल्या कुळहक्क शेतकरी बांधवांचे दहिवडीनंतर म्हसवड येथील तलाठी कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरूच असून आंदोलनाचा काल विसावा दिवस होता. 

सुमारे दीडशे वर्षांपूर्वीपासून कब्जे वहिवाटीत असलेल्या शेतजमिनी मोठ्या संख्येने शेतकरी कसत आहेत. सातबारा सदरी रेषेच्यावर येथील सरंजामांची व रेषेच्याखाली कुळ असलेल्या शेतकरी बांधवांची नोंदी आहेत. सरंजामांची पोकळ नोंद असलेली नावे कमी करून कसेल त्याची जमीन या कायद्यांतर्गत कुळधारक शेतकऱ्यांचीच नावे सातबारा सदरी नोंद करण्यासाठी श्रमिक मुक्ती दलातर्फे डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. 

भुतेघरच्या शेतकऱ्याची सोशल मीडियावर धूम; कन्नड, भोजपुरी, पंजाबी, मराठी, हिंदी भाषांतील हजार गाण्यांना तुफान लाईकस्

सरकारने वेळोवेळी कुळ हक्काबाबत कायदे केले. परंतु, म्हसवड भागातच त्याची योग्य न्याय पध्दतीने महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी केली नसल्यामुळे कुळ व सरंमजाम यांच्यात जमीन मालकी हक्काचा वाद उफाळला आहे. दहिवडी प्रांताधिकारी कार्यालयासमोर 11 फेब्रुवारीपासून ठिय्या आंदोलन सुरू असून माणच्या इतिहासातील सर्वांत जास्त दिवस चालू असलेले हे दुसरे आंदोलन आहे. यापूर्वी टेंभू पाण्यासाठी 16 गावांच्या लोकांचे नेतृत्व अनिल देसाई यांनी केले होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर दहिवडी येथील आंदोलन म्हसवड तलाठी कार्यालयाच्या आवारात सुरू ठेवण्यात आले आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे