esakal | वाह, क्या बात है! बहुल्यात शेतकऱ्यांनी बांधले तब्बल 41 बंधारे; 68 विहिरींच्या पाणीपातळीत मोठी वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

तालुक्‍यातील कोयना नदीकाठच्या काही गावांना आजही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

वाह, क्या बात है! बहुल्यात शेतकऱ्यांनी बांधले तब्बल 41 बंधारे; 68 विहिरींच्या पाणीपातळीत मोठी वाढ

sakal_logo
By
विलास माने

मल्हारपेठ (जि. सातारा) : ओढ्याच्या वाहून जाणाऱ्या पाण्याला दगड-माती, पालापाचोळ्याच्या सहाय्याने ठिकठिकाणी अडवून बहुले येथे 41 माती बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यातून 68 विहिरींची पाणीपातळी वाढल्यामुळे बहुले गावात पाणी अडवा-पाणी जिरवा योजना यशस्वी झाली आहे. शासनाच्या लघुपाटबंधारे, सिंचन विभागाकडून 60 लाखांचा निधी त्यासाठी देण्यात आला आहे. 

तालुक्‍यातील कोयना नदीकाठच्या काही गावांनाही आजही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जुन्या उपसा जलसिंचन योजना मोडीत निघाल्यामुळे शेती पाण्याविना उपाशी राहिली आहे. यापैकीच बहुले, पाळेकरवाडी, जरेवाडी परिसर उपसा योजनेपासून वंचित राहिला. काही विहिरींमुळे परिसर ओलिताखाली असला तरीही नोव्हेंबरनंतर पाणीपातळी खालावते. 

सातारकरांनो, काळजी घ्यावीच लागेल! ‘Oxygen Bed’ शिल्लकच नाहीत; जाणून घ्या बेडची संख्या..

यामुळे बहुलेच्या पाळेकरवाडी, जरेवाडी व हावळेवाडीकडून वाहत येणाऱ्या पूर्व आणि पश्‍चिम बाजूने वाहत असलेल्या गावओढ्यावर पहिल्या वर्षी 11, गेल्या वर्षी 13 आणि यंदा 17 असे एकूण 41 मातीचे बंधारे लोकसहभागातून करण्यात आले आहेत. बहुलेचे शेतकरी राजू पाटील, मानसिंग पानस्कर, सर्जेराव पानस्कर, भरत पवार, भरत पानस्कर, काकासाहेब पाटील, पांडुरंग डवरी, अशोक पवार, अंकुश पानस्कर, राजेंद्र पानस्कर यांनी सहकार्य केले. त्यातून उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. 

फोटो काढून फेसबुकवर मिरवण्याशिवाय नगराध्यक्षांनी काहीच काम केलेले नाही

"सिंचनाचे महत्त्व लोकांना पटले असून, सर्वजण सहकार्य करत आहेत. त्यातूनच आम्ही 41 बंधारे बांधल्याने 68 विहिरींची पाणीपातळी वाढली आहे.'' 

-राजू पाटील, शेतकरी, बहुले 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top