esakal | माजी पोलिस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन; साताऱ्यातील पुसेगावात होणार अंत्यसंस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

धनंजय जाधव यांनी केलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल तत्कालीन राष्ट्रपतींनी 1992 च्या स्वातंत्र्यदिनी "पोलिस पदक" प्रदान करून गौरव केला.

माजी पोलिस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन; साताऱ्यातील पुसेगावात होणार अंत्यसंस्कार

sakal_logo
By
ऋषिकेश पवार

विसापूर (जि. सातारा) : न्यायप्रिय, प्रामाणिक, कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त धनंजय नामदेवराव जाधव यांचे मंगळवारी (ता. 30) पहाटे निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. सातारा जिल्ह्यातील पुसेगाव या त्यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जाधव यांनी सन-1973 भारतीय पोलिस सेवेत (आय. पी. एस.) प्रवेश केला. जाधव यांनी केलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल तत्कालीन राष्ट्रपतींनी 1992 च्या स्वातंत्र्यदिनी "पोलिस पदक" प्रदान करून गौरव केला. त्याच साली राज्याच्या पोलिस महासंचालकांनी "सन्मान चिन्ह" देऊन जाधव यांच्या चांगल्या कामाचा गौरव केला आहे.

धक्कादायक! कोयनेत बांधकाम विभागातील लिपिकाची गळफास घेऊन आत्महत्या 

सन 2001 मध्ये त्यांनी मुंबईच्या आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली. तसेच मार्च 2002 मध्ये त्यांची अप्पर पोलिस महासंचालक पदी पदोन्नती होऊन राज्य पोलीस मुख्यालयातील महामार्ग सुरक्षा पथकाच्या महाराष्ट्राच्या प्रमुख पदी नियुक्ती झाली.

सातारकर आठच्या आत घरात! संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी बाजारपेठा बंद; पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top