कऱ्हाड, मलकापूरची डेंजरझोनच्या दिशेने वाटचाल?; बाधितांच्या आकड्यात झपाट्याने वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

कऱ्हाड शहरासह तालुक्‍यात कोरोना बाधितांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढत चालली आहे. त्यामुळे तालुक्‍याची चिंता वाढली आहे.

कऱ्हाड, मलकापूरची डेंजरझोनच्या दिशेने वाटचाल?; बाधितांच्या आकड्यात झपाट्याने वाढ

कऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाड शहरासह तालुक्‍यात एकाच दिवशी तब्बल 73 कोरोना बाधितांची भर पडली आहे. दोन-चारवर असणारी बाधितांची संख्या 73 वर गेल्याने शहासह तालुक्‍याची डेंजरझोनच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. कऱ्हाड शहर आणि मलकापूरमधील बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने दोन शहरांचा धोका वाढल्याने तातडीने आवश्‍यक उपाययोजना राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. 

कऱ्हाड शहरासह तालुक्‍यात कोरोना बाधितांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढत चालली आहे. त्यामुळे तालुक्‍याची चिंता वाढली आहे. तालुक्‍यात आतापर्यंत चार- पाच बाधितांची असणारी संख्या ही दोन आकड्यात जाऊन पोचली आहे. आज एकाच दिवशी तब्बल 73 कोरोना बाधितांची भर पडली आहे. त्यामध्ये कऱ्हाड शहरातील मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शनिवार पेठेसह अन्य ठिकाणी 12, मलकापूर 15, शिवनगरला सहा, उंडाळे व हजारमाची येथील प्रत्येकी चार, काले, जुळेवाडी व कोळे येथील प्रत्येकी तीन, सैदापूर, तांबवे, गोंदी, येणके, भोसलेवाडी येथील प्रत्येकी दोन, तर ओगलेवाडी, कालेटाके, शेरे, कळंत्रेवाडी, जाळगेवाडी, पठारवाडी, कार्वेनाका, शिवाजीनगर, मालखेड, जखीणवाडी, उंब्रज, आगाशिवनगर, कोरेगाव येथील प्रत्येकी एक बाधिताचा समावेश आहे. कऱ्हाड शहर व मलकापूर शहरातील बाधितांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दोन्ही शहरांची डेंजरझोनच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यासाठी आतापासूनच तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. 

Honeymoon ला न जाता बायकोला अभ्यास करायला लावला अन् बायको PSI होताच नवऱ्यानं कडक सॅल्यूट ठोकला 

सूक्ष्म कंटेनमेंटच्या सूचना : प्रांताधिकारी दिघे 

कऱ्हाड व मलकापूरमधील बाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग, पालिका, पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती देऊन प्रांताधिकारी उत्तम दिघे म्हणाले, ""कऱ्हाड व मलकापूरमधील बांधितांच्या परिसरात सूक्ष्म कंटेनमेंट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्‍यक ती काळजी घ्यावी.'' 

कोणाचीही गय नको, कोरोनाचे निर्बंध आणखी कडक करा : सभापती रामराजेंच्या प्रशासनाला सक्त सूचना

धोक्‍याची घंटा! कोरोनाची कुठलीच भीती लोकांना नाही; कडक निर्बंधांची आवश्‍यकता

अखेर खासगी डॉक्टरांसाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना काढावा लागला आदेश

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top