esakal | कोरोनाचा उद्रेक! गावोगावच्या ग्रामसुरक्षा समित्या झाल्या निष्क्रीय; प्रशासनाच्या पुढाकाराची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

शासनाने दिलेल्या आदेशाचे आणि सूचनांचे काटेकोर पालन करत गावात कोरोना संक्रमण होऊ नये यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यासाठी गावपातळीवर ग्रामसुरक्षा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा उद्रेक! गावोगावच्या ग्रामसुरक्षा समित्या झाल्या निष्क्रीय; प्रशासनाच्या पुढाकाराची गरज

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनाला गावपातळीवर नियंत्रणात ठेवण्याच्या उपाययोजना करून आवश्‍यक कार्यवाही करण्यासाठी ग्रामसुरक्षा समित्यांची स्थापना केली आहे. मात्र, या समित्याच काही गावांचा अपवाद वगळता बहुतांश गावात निष्क्रीय असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. त्यामुळे गावागावांतील कोरोनासंदर्भातील उपाययोजना आवश्‍यक त्या प्रमाणात राबवल्या जात नाहीत. भविष्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेत पुन्हा एकदा या समित्या ऍक्‍टिव्ह करण्याची गरज आहे. 

शासनाने दिलेल्या आदेशाचे आणि सूचनांचे काटेकोर पालन करत गावात कोरोना संक्रमण होऊ नये यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यासाठी गावपातळीवर ग्रामसुरक्षा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. सरपंच हे या समितीचे अध्यक्ष आणि त्यामध्ये पोलिस पाटील, ग्रामसेवक, तलाठी व गावातील काही जणांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील कोरोना काळात या समित्यांनी आवश्‍यक त्या उपाययोजना करून चांगली कामगिरी केली. त्याची दखल घेत समित्यांना शासनाने दंड करण्याचे, पोलिसी कारवाया करण्याचेही अधिकार दिले. त्यातून अनेकांवर दंड, पोलिसी कारवाईही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे समितीची चांगलीच जरब गावोगावी होती. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यामुळे समित्यांना मरगळ आली. त्यातच मध्यंतरी जिल्ह्यातील निम्म्यावर गावात निवडणुकीचे वातावरण होते. त्यामुळे त्यामध्येही सत्ताबदल झाल्याने गावकारभारी बदलले. 

ऑनलाइन परीक्षेस कोरोना संसर्गाचा प्रश्न येतोच कुठे? शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी संतप्त 

अशातच गेल्या महिन्यापासून पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. दररोज झपाट्याने बाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे शासनाने नवीन नियमावली लागू केली आहे. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे मात्र कोरोना वाढत असतानाही समित्या निष्क्रीय असल्याचे जिल्ह्यातील गावागावांत चित्र आहे. त्यामुळे बाहेर गावावरून, बाहेरच्या राज्यातून, परदेशातून येणाऱ्यांवर म्हणावा तेवढा वॉच ठेवला जात नाही. आरोग्य विभाग, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका काम करत असल्याने दक्षता समित्यांचे कारभारी निवांत आहेत. मात्र, त्या समितीतील पदाधिकारी आणि सदस्यांनाही वाढणारा धोका ओळखून आता अंगावरील झूल टाकून कार्यरत राहण्याची गरज निर्माण झाली आहे. 

शिवेंद्रसिंहराजेंच्या शब्दास मान; नगराध्यक्षांचा राजीनामा 

नवीन कारभाऱ्यांच्या पुढाकाराची गरज 

सातारा जिल्ह्यातील नऊशेवर गावांतील नवीन सरपंच निवडी मध्यंतरी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे गावाच्या कारभाराची सूत्रे गेली आहेत. गावचे सरपंच ग्रामसुरक्षा समितीचे अध्यक्ष असतात. त्यामुळे आता नवीन कारभाऱ्यांनीच गावाच्या सुरक्षितेतसाठी कोरोनाला गावच्या वेशीबाहेर रोखण्यासाठी पुढाकार घेऊन ग्रामसुरक्षा समित्या ऍक्‍टिव्ह करण्याची गरज आहे. 

लॉकडाउनच्या पार्श्वभुमीवर जनतेला दिलासा देण्यासाठी उदयनराजेंनी 'महाविकास'ला सूचविली उपाययाेजना 

बहिणीला त्रास देणाऱ्या युवकाचा साताऱ्यात दगडाने ठेचून खून; मृतदेह खंडोबा माळावर जाळला

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top