esakal | धोक्‍याची घंटा! कोरोनाची कुठलीच भीती लोकांना नाही; कडक निर्बंधांची आवश्‍यकता
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

कोरोनाची कुठलीच भीती लोक मनात बाळगत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. बहुतांशी लोकांच्या तोंडाला मास्क नाही.

धोक्‍याची घंटा! कोरोनाची कुठलीच भीती लोकांना नाही; कडक निर्बंधांची आवश्‍यकता

sakal_logo
By
गजानन गिरी

मसूर (जि. सातारा) : विभागात कोरोना रुग्णवाढीचा वेग आठवड्यात वाढला आहे. मसूर व हेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रुग्ण आढळल्यामुळे भयावह स्थिती आहे. विभागासाठी ही अत्यंत धोक्‍याची घंटा आहे. गेल्या एप्रिल-मे महिन्यात कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेला विभाग पुन्हा त्याच गतीने वाटचाल करीत आहे. वाढत्या आकड्यांनी जोर धरला असताना प्रशासनाच्या कडक निर्बंधांची कडकपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. 

विभागातील गेल्या दहा दिवसांची आकडेवारी पाहता मसूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मसूरसह घोलपवाडी, निगडी, कामबिरवाडी या ठिकाणी एकूण 15, तर हेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दहा रुग्णांची संख्या आहे. त्यात खराडे, हेळगाव, कवठे गावांचा समावेश आहे. आठ दिवसांत संशयित रुग्णांच्या तपासणीला पाठवलेल्या नमुन्यांपैकी पॉझिटिव्हिटी रेट वाढताना दिसत आहे. विभागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या मोठी गंभीर समस्या बनू पाहत आहे. 

Video पाहा : गनिमी काव्याने निघाली बगाड मिरवणुक; पाेलिसांची धरपकड सुरु

कोरोनाची कुठलीच भीती लोक मनात बाळगत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. बहुतांशी लोकांच्या तोंडाला मास्क नाही. सोशल डिस्टन्सिंगचा अभाव, सॅनिटायझरचा वापर न करणे आदी बाबी दृष्टीस पडत आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य प्रशासनाने कंबर कसली आहे. आशा वर्कर्सद्वारे घरोघरी सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. आवश्‍यक ती खबरदारी घेण्यास सूचना दिल्या जात आहेत. पोलिस प्रशासनाची गाडी नियम व सूचना देत संपूर्ण विभागात फिरत आहे. लोकांकडून नियमाचे उल्लंघन होत असल्याने नियमाबाबत कडक निर्बंध लादणे व कारवाईबाबतची कडक मोहीम हाती घेत दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. 

प्रतिवर्षाप्रमाणे बावधनची बगाड यात्रा उत्साहात; प्रशासनाच्या नियमांना ठेंगा

अकलूजच्या मोहिते-पाटलांचा नीरा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचे भूत पुन्हा जनतेच्या मानगुटीवर बसविण्याचा प्रयत्न

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top