लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाटण तालुक्यातील ज्योतिबा देवाची यात्रा रद्द

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

तारळे (जि. सातारा) : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र जळव (ता. पाटण) येथील ज्योतिबा देवाची वार्षिक यात्रा कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने रद्द केली आहे. त्यामुळे भाविकांनी याची नोंद घेऊन यात्रेसाठी जळवला येऊ नये, असे आवाहन जळसिंग देव ऊर्फे ज्योतिर्लिंग देवस्थान ट्रस्ट जळव यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

गेल्या वर्षीही यात्रा पार पडली आणि लॉकडाउन सुरू झाले. मात्र, कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने यंदा परंपरागत उत्सवाला फाटा देत साध्या व प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटी पाळून मुख्य दिवस पार पडणार आहे. 

यात्रेचा मुख्य दिवस एक मार्च आहे. मोजक्‍या मानकऱ्यांच्या उपस्थितीत केवळ धार्मिक कार्यक्रम व नित्यकर्म केले जाणार आहे. कोणत्याही भाविकांना जळव परिसरात प्रवेश दिला जाणार नसून पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. भाविकांनी जळवकडे येऊ नये. अन्यथा पोलिस कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा उंब्रजचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी दिला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com