वाईत कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जमावबंदी; पालखी, सांस्कृतिक कार्यक्रमास निर्बंध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News Satara News

कृष्णातीरावरील सात घाटांवर एका पाठोपाठ एक याप्रमाणे सव्वामहिना हा उत्सव सुरू असतो.

वाईत कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जमावबंदी; पालखी, सांस्कृतिक कार्यक्रमास निर्बंध

वाई (जि. सातारा) : येथील श्री कृष्णामाईच्या उत्सवास भीमकुंड आळीतील उत्सवाने उद्यापासून (शुक्रवारी) प्रारंभ होत आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शहरात 144 कलम लागू करून उत्सवातील पालखी, छबिना, हळदी- कुंकू, महाप्रसाद, भजन, कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास निर्बंध घातले आहेत. त्यामुळे या वर्षीचा उत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. 

कृष्णातीरावरील सात घाटांवर एका पाठोपाठ एक याप्रमाणे सव्वामहिना हा उत्सव सुरू असतो. प्रत्येक घाटावर चार ते पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक व करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या वर्षींचा उत्सव शुक्रवार (ता. 12) श्री कृष्णाबाई संस्थान घाट भीमकुंड आळीच्या उत्सवाने होत आहे. कोरोनामुळे जिल्ह्यातील सर्व यात्रा, उत्सव रद्द केले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कायदा व सुवव्यवस्थेच्या दृष्टीने शहरात कृष्णाबाईच्या उत्सव काळात 12 फेब्रुवारी ते 26 मार्च 21 अखेर 144 कलम लागू केले असून, काही निर्बंध घातले आहेत. या वेळी उत्सवात पालखी व छबिना, देवीची ओटी व दर्शन घेण्यास, महाप्रसाद, तसेच या कालावधीत भजन, कीर्तन या सारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे. 

पुण्याला जाताना तुम्हालाही असा अनुभव आलाय, तर आम्हाला जरुर कळवा..

देवीची प्रतिष्ठापना करून देवीचे नित्याचे धार्मिक विधी फक्त संबंधित पुजारी व ठराविक दहा व्यक्तींचे उपस्थितीत पार पाडण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन करून या वर्षींचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवात सोशल डिस्टन्सचे पालन करून केवळ धार्मिक कार्यक्रम करण्याचा, तसेच हळदी- कुंकू, भजन, कीर्तन, कथा कथन अथवा अन्य कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम न करण्याचा निर्णय आळीकरांच्या सहमतीने घेण्यात आला आहे. भीमकुंड आळीतील उत्सवानंतर मधली आळी (ता. 16 फेब्रुवारी), धर्मपुरी (ता. 22 फेब्रुवारी), गणपती आळी (ता. 28 फेब्रुवारी), ब्राह्मणशाही (ता. 5 मार्च), रामडोह आळी ( ता. 15 मार्च) व गंगापुरी ( 19 मार्च) असे एकापाठोपाठ एक उत्सव होणार आहेत. या वर्षी प्रत्येक आळीचा उत्सव घाटावर खुल्या जागेत न होता मंगल कार्यालयात होणार आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top