esakal | सातारा-पंढरपूर महामार्गावरील शिंदेवाडीत फॅक्टरीला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

सातारा-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी आणि निढळ या दोन्ही गावाच्या मधोमधच डुरियम कंपनी आहे.

सातारा-पंढरपूर महामार्गावरील शिंदेवाडीत फॅक्टरीला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान

sakal_logo
By
ऋषिकेश पवार

विसापूर (जि. सातारा) : सातारा-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला शिंदेवाडी (कटगुण, ता. खटाव) येथील माळरानावर असलेल्या डुरियम डोअर्स इंडस्ट्रीज कंपनीला रविवारी (ता. २८) सकाळी सात वाजता आग लागली. लॅमिनेटेड दरवाजे उत्पादित करणारी ही फॅक्टरी असून या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

शिंदेवाडी आणि निढळ या दोन्ही गावाच्या मधोमधच ही डोअर्स कंपनी आहे. दरम्यान, ही आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी कंपनीकडे धाव घेतली. तसेच कंपनीचे मालक वसंत पटेल (रा. पुसेगाव) यांना कंपनीमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच त्यांनी अग्निशमन दलाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अग्निशमन दलाशी वेळेत संपर्क न झाल्यामुळे बंब घटनास्थळी पोहचण्यासाठी उशीर झाला. सुरुवातीला उपाययोजना म्हणून पटेल यांनी स्थानिक पाण्याच्या टँकरच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला.

न विचारता शाळेतून बाहेर गेल्याने विद्यार्थ्याला शिक्षकांकडून जबर मारहाण; पाचगणीत ठाण्याचा विद्यार्थी गंभीर जखमी

दरम्यान,अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी, मोठ्या प्रमाणावर लाकूड तसेच प्लास्टिक जळत असल्यामुळे कंपनीतून आगीचे डोंब निघत होते. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. दोन बंबांनी आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, प्लायवूड दरवाजे, लाकडी साहित्य, मशनरी जळून खाक झाली आहे. तसेच ही आग नेमकी लागली कशामुळे याबाबत अद्यापही माहिती मिळू शकली नाही. आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून घटनास्थळी पुसेगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते.

राजकीय गट-तट बाजूला ठेऊन खटाव-पुसेगावचा विकास साधणार : आमदार शशिकांत शिंदे

महाराष्ट्र दिनापासून पात्र प्रकल्पग्रस्तांना सांगली, साताऱ्यातील जमिनींचे वाटप करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

तेजस्वीचा ताबा मला द्या अन्यथा स्नेहलला ठार मारतो; सासूला दिली धमकी

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top