esakal | VIDEO : एकदम झक्कास! काळजाचा ठोका चुकवणारा 1800 फूट 'कोकणकडा' कोणेगावच्या गिर्यारोहकाकडून सर
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

मानसिंग चव्हाण यांनी यापूर्वी वजीर, खडापारशी (वणरलिंगी), लिंगाणा, तैल-बैल, ड्युक्‍स नोज असे सह्याद्री पर्वतरांगेतील उत्तुंग असे सुळके सर केले आहेत.

VIDEO : एकदम झक्कास! काळजाचा ठोका चुकवणारा 1800 फूट 'कोकणकडा' कोणेगावच्या गिर्यारोहकाकडून सर

sakal_logo
By
गजानन गिरी

मसूर (जि. सातारा) : कोणेगाव (ता. कऱ्हाड) येथील मानसिंग चव्हाण या गिर्यारोहकाने महाराष्ट्रातील सर्वांत उंच हरिश्‍चंद्रगडाचा 1800 फूट आव्हानात्मक कोकणकडा रोपच्या साह्याने रॅपलिंग करत उतरला. कड्याची खोली पाहून क्षणभर काळजाचा ठोका चुकवणारा हा कडा त्यांनी अखेर उतरला अन्‌ त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना आनंदाचा पारावर उरला नाही. 

पुण्यातील एसएल ऍडव्हेंचरच्या टीमसोबत रविवारी आवश्‍यक उपकरणे घेऊन राजूरमार्गे पाचनई गावामध्ये ते पोचले. सकाळी उठून सेट-अप लावला. रॉकपासून दूर गेल्यावर हवेमुळे गोल-गोल फिरू लागले. कोकणकडा नजरेत मावत नव्हता. जवळपास 800-900 फूट कातळाचा स्पर्श होणार नाही याची त्यांना जाणीव होती. खोली जास्त असल्यामुळे रोप फीड होत नव्हता. रोप डिसेंडरमधून फिरवायला खूप कष्ट घ्यावे लागत असल्याने अर्धा कडा पार केल्यावर रोप आपोआप फिरू लागला. दुसरा टप्पा 500-600 फुटांचा होता. वरच्या ओव्हरहॅंगचा टप्पा पार केल्यावर त्यांची चांगलीच हिम्मत वाढली. खालच्या पॅचमध्ये 100-150 फुटांचा ओव्हरहॅंग आहे. स्क्री लेजवर येथे दगड मातीतून घसरडी वाट आहे. रॅपल संपला अन्‌ चव्हाण यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी एकच जल्लोष केला. 

रूपाली चाकणकरांनी अध्यक्षपदासाठी सूचविलेल्या नावास राष्ट्रवादीतूनच विरोध; शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या निर्णयाकडे लक्ष 

खरी कसोटी होती नळीची वाट चढण्याची. त्यांना परत गडावर जायचे होते. ट्रॅव्हर्स मारून वाटेने चढून पुन्हा कोकणकड्याचा माथा गाठायचा होता. नळीची वाट चढून परत ते गडावर पोचले. हरिश्‍चंद्रगड किल्ला पुणे-ठाणे व नगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाजवळ असणारा अजस्त्र डोंगर. किल्ल्यावर दोन-अडीच हजार वर्षांपूर्वीची पुरातन मंदिरे व लेणी आहेत. किल्ल्यावर वनस्पती व प्राणी संपत्ती विपुल आहे. किल्ल्यावरून शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन-नाणेघाट, मोरोशीचा भैरवगड असे अनेक किल्ले दिसतात. रोहिदास, नाप्ता, आजोबा अशी अनेक उंच शिखरे नजरेस पडतात. मनसोक्त निसर्गसौंदर्य पाहायला मिळते. 

सातारा जिल्ह्यात Covid 19 ची लस संपली! दोन लाख नागरिकांचा दुसरा डोस लांबणीवर
 
भारती विद्यापीठ रुग्णालयात अधिकारी 

दरम्यान, मानसिंग चव्हाण यांनी यापूर्वी वजीर, खडापारशी (वणरलिंगी), लिंगाणा, तैल-बैल, ड्युक्‍स नोज असे सह्याद्री पर्वतरांगेतील उत्तुंग असे सुळके सर केले आहेत. सध्या ते पुण्यातील भारती विद्यापीठातील रुग्णालयात अधिकारी म्हणून काम पाहतात. 

खवय्यांनो खुशखबर! साताऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांची मटण, चिकनच्या दुकानांना परवानगी

रामदास आठवलेंच्या Go Corona, Corona Go..ला उदयनराजेंचे खास समर्थन; शरद पवारांच्या भेटीचेही उलगडले सत्य

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top