esakal | शेतकर्‍यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका; आमदार गोरेंचा सरकारला दम
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News Satara News

शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून शेतीपंपासाठी वीज जोडणी मागत आहेत. ती जोडणी देण्यास शासन कायम टाळाटाळ करत आहे.

शेतकर्‍यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका; आमदार गोरेंचा सरकारला दम

sakal_logo
By
रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : कोरोनाच्या महामारीमुळे शेतकरी सध्या प्रचंड मोठ्या अडचणीत आहे. अशा परिस्थितीत जर सक्तीची वीज बिल वसुली थांबली नाही, तर महावितरणला ताळ्यावर आणण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची भूमिका आम्हाला तातडीने घ्यावी लागेल. महावितरणने शेतकर्‍यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशारा आमदार जयकुमार गोरे यांनी दिला. दहिवडी येथे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आमदार जयकुमार गोरे म्हणाले, मागील दोन वर्षात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पिके आहेत. शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून शेतीपंपासाठी वीज जोडणी मागत आहेत. ती जोडणी देण्यास शासन कायम टाळाटाळ करत आहे. वीज जोडणी न दिल्यामुळे शेतकरी अवैधरित्या विजेचा वापर करत आहेत. विजेचा वापर सुरुच आहे, त्यामुळे प्रत्येक ट्रान्स्फॉर्मर हे ओव्हर लोडेड आहेत. ओव्हर लोडेड असल्यामुळे ट्रान्स्फॉर्मर जळण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. जळालेल्या ट्रान्स्फॉर्मरच्या ठिकाणी नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी जेव्हा शेतकरी महावितरणकडे जातात, त्यावेळी वीज बिल भरल्याशिवाय ट्रान्स्फॉर्मर जोडणार नाही अशी भूमिका महावितरण घेते. महिनोंमहिने डीपी जोडले जात नाहीत. शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने हातातोंडाशी आणलेलं पीक फक्त वीज उपलब्ध न झाल्यामुळे वाया जात आहे. आधीच परिस्थितीने भरडलेल्या शेतकर्‍यांचे शोषण महावितरणकडून सुरु आहे.

शरद पवारांनी किती फडांवर जावून कुस्त्या खेळल्या, हेही सांगावं

आमदार गोरे पुढे म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात की आम्ही सक्तीची वीज बिल वसुली करणार नाही. पण, वस्तुस्थिती वेगळी आहे. कोरोना कालखंडानंतर शेतकर्‍यांना शेतीपंपाची बिले आली. जी बिले शेकड्यात येत होती ती बिले हजारांमध्ये आली. एका शेतकर्‍याला तर दीड लाख रुपये बिल आले आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर आम्ही बिल कमी करुन देवू असे ते म्हणतात. पण, मुळात जी बिले पन्नास, शंभर, दोनशे, तीनशे पट आलीत ती फक्त दहा, वीस टक्के कमी करुन काही साध्य होत नाही. महावितरणने जी चुकीची बिले आलीत त्यांची पूर्वीची सरासरी काढून बिले द्यावीत व शेतकर्‍यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

कायतर म्हणे.. आम्हाला आकाश द्या, चंद्र-सूर्य तारे द्या; सदाभाऊंनी शेतकऱ्यांना फटकारले

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top