esakal | जिल्ह्यातील टोलनाक्‍यांवर MH11-MH50 वाहनांना 'टोलमाफी' द्या : आमदार शशिकांत शिंदे
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

जिल्ह्यातील लोकांना स्वतःच्याच जिल्ह्यातील टोलनाक्‍यांवर टोल भरावा लागत असल्याची खंत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील टोलनाक्‍यांवर MH11-MH50 वाहनांना 'टोलमाफी' द्या : आमदार शशिकांत शिंदे

sakal_logo
By
राजेंद्र वाघ

कोरेगाव (जि. सातारा) : सुमारे 15 वर्षांपासून सुरू असलेले पुणे-सातारा महामार्गाचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. मात्र, टोल दरवाढ करून वसूल केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील लोकांना स्वतःच्याच जिल्ह्यातील टोलनाक्‍यांवर भरावा लागणारा टोल माफ करावा, अन्यथा लॉकडाउन उठताच आंदोलन करण्याचा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे. 

यासंदर्भातील पत्रकात आमदार शिंदे यांनी म्हटले आहे, की जिल्ह्यातील लोकांना स्वतःच्याच जिल्ह्यातील टोलनाक्‍यावर टोल भरावा लागत आहे. आता एक एप्रिलपासून टोल दर वाढला आहे. पुणे-सातारा महामार्गाचे काम 2006 पासून सुरू झाले आणि अद्यापही हे काम पूर्ण नाही. काहींची मागणी आहे, की पाच टक्के टोल कमी करावा; परंतु आमची पूर्वीपासूनची मागणी आहे, की सातारा जिल्ह्यातील टोलनाक्‍यांवर एमएच11 आणि एमएच 50 पासिंगच्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी मिळावी. आता टोलनाक्‍यावर कंत्राटदार बदलला आहे. रिलायन्सकडे महामार्गाचे काम आहे आणि हे काम अद्यापही पूर्ण नाही; परंतु टोल मात्र दरवाढ करून वसूल केला जात आहे. यासंदर्भात राज्याकडे मागणी केली असता, हा निर्णय केंद्राकडे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे केंद्र सरकार कंत्राटदाराला पाठीशी का घालत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. 

तासवडे एमआयडीसीत स्थानिकांना कोलदांडा; शिक्षण, अनुभव असतानाही नोकऱ्यांत बाहेरच्यांना संधी

सध्या लॉकडाउन आहे. याप्रश्नी आंदोलन करण्यासाठी लोकांना भाग पाडू नये, अशी आमची अपेक्षा आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या प्रश्नामध्ये लक्ष घालून जिल्हावासीयांना न्याय मिळवून द्यावा. ज्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील वाहनांना खेड शिवापूर व अन्य टोलनाक्‍यांवर माफी आहे, त्याच धर्तीवर सातारा जिल्ह्यातील वाहनांना जिल्ह्यातील टोलनाक्‍यांवर टोल माफी मिळावी. लॉकडाउन काळात हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अन्यथा लॉकडाउन उठताच आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

Corona Virus शनिवार आणि रविवारीच बाहेर येतो का?; खासदार उदयनराजेंचा सरकारला सवाल

..अन्यथा मराठवाडीच्या जलाशयात सत्याग्रह; नरेंद्र पाटलांच्या बैठकीत ठरली लढ्याची रणनीती

सातारकरांनो, काळजी घ्यावीच लागेल! ‘Oxygen Bed’ शिल्लकच नाहीत; जाणून घ्या बेडची संख्या..

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top