esakal | 'रिलायन्स'ने प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळले; टोल दरवाढीविरोधात खासदार उदयनराजे आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

कर्नाटक राज्यातील टोल कमी असून, महामार्गावरही मोठ्या प्रमाणात चांगल्या सुविधा पुरविण्यात येतात.

'रिलायन्स'ने प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळले; टोल दरवाढीविरोधात खासदार उदयनराजे आक्रमक

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : आनेवाडी आणि खेड शिवापूर येथील नाक्‍यावरील टोलच्या दरात झालेली वाढ मागे घेण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे केली आहे. 

या संदर्भात उदयनराजेंनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे, की राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी आणि खेड शिवापूर येथील नाक्‍यावरील टोलच्या दरात पाच टक्के वाढ करण्यात आली आहे. ही वाढ प्रवासी आणि नागरिकांच्या संयमाचा अंत पाहणारी आहे. वास्तविक महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम 2013 मध्ये पूर्ण होणे आवश्‍यक होते. मात्र, मुदत संपून आठ वर्षे झाली तरी काम सुरूच आहे. काम अपूर्ण असताना, महामार्गावर असुविधा असताना, रस्ते खराब असतानाही टोलवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ अन्यायकारक आहे. 

Honeymoon ला न जाता बायकोला अभ्यास करायला लावला अन् बायको PSI होताच नवऱ्यानं कडक सॅल्यूट ठोकला 

कर्नाटक राज्यातील टोल कमी असून, महामार्गावरही मोठ्या प्रमाणात चांगल्या सुविधा पुरविण्यात येतात. त्या मानाने महाराष्ट्रात टोल जास्त आणि असुविधाही जास्त आहेत. त्यामुळे त्या भागातील प्रवासी सातारा- पुणे प्रवासादरम्यान असुविधेबाबत अक्षरक्ष: शिव्यांची लाखोली वाहत असतात. ही स्थिती असतानाही "रिलायन्स'ने टोलच्या दरात वाढ करत प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळले असून, संबंधित कंपनीने केलेली दरवाढ मागे घेत जुन्या टोलच्या दरात पाच टक्के कपात करण्याची मागणी प्रवासी, चालकांकडून मागणी होत आहे. 

कोणाचीही गय नको, कोरोनाचे निर्बंध आणखी कडक करा : सभापती रामराजेंच्या प्रशासनाला सक्त सूचना

मदनरावांनी उचलले भोसलेंच्या प्रचाराचे शिवधनुष्य; डॉ. इंद्रजित मोहितेंच्या चुप्पीने संभ्रम, कार्यकर्तेही बुचकुळ्यात

केंद्राला सहकारी साखर कारखानदारी मोडीत काढायची आहे का?; गृहराज्यमंत्र्यांचा मोदी सरकारला सवाल

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top