esakal | मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही, तर रक्तपात होईल; उदयनराजेंचा सरकारला कडक इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

मराठा आरक्षणप्रश्नी खासदार उदयनराजेंनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली असून सरकारच्या गाफिलपणावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही, तर रक्तपात होईल; उदयनराजेंचा सरकारला कडक इशारा

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : मराठा आरक्षणप्रश्नी खासदार उदयनराजेंनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली असून सरकारच्या गाफिलपणावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. ज्यांना लोकांनी निवडून दिले, त्या सो कॉल्ड आमदारांनी सांगावे की, या कारणांसाठी आम्ही मराठा आरक्षण देऊ शकलो नाही. पण, ते काहीच बोलत नाहीत. त्यामुळे या सगळ्यांना मुकबधीरच्या शाळेत घाला, मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकून द्या, असा सणसणीत टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारला लगावला आहे. 

मराठ आरक्षण प्रश्नावर उदयनराजेंनी राज्य सरकारवर आज पुन्हा टीकेची झोड उठवली असून सरकारवर ताशेरे ओढले आहेत. जलमंदीर पॅलेस या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी मराठा आरक्षणाच्या विषयावर पत्रकारांनी संवाद साधला. उदयनराजे म्हणाले, तुम्हाला लोकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे या सो कॉल्ड आमदारांनी जनतेला सांगून टाकावे या कारणांसाठी आम्ही मराठा आरक्षण देऊ शकत नाही. पण, ते काहीही बोलत नाहीत. या सगळ्यांना मुकबधीरच्या शाळेत घाला. नको तिथेही नको, मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकून द्या. 

मराठा आरक्षण द्या, अन्यथा आम्हाला विष पिऊन मरू द्या; खासदार उदयनराजेंचा सरकारला गर्भित इशारा

ते पुढे म्हणाले, हो विष पिणारच आहे. पण, त्यांना विष पाजणार आहे. ज्यावेळी माणसाच्या गळ्यापर्यंत येते, त्यावेळी तो म्हणतो मी का आत्महत्या करू. त्यांच्यामुळे समाजावर अत्याचार होता आहेत. राज्यकर्त्यांनी अशी-तशी तर वाटच लावली. त्यामुळे आता त्यांचीच वाट लावून टाका, असे सांगून उदयनराजे म्हणाले, नक्षलवादी कशातून निर्माण होतात. न्याय मिळत नाही म्हणूनच निर्माण होतात ना. हीच मंडळी नक्षलवादी निर्माण करतात. कोणीपण असो हा पक्ष कोणताही असो सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी कोणीही टाळू शकत नाहीत. प्रत्येकजण जबाबदार असून यामध्ये विरोधी पक्षही आलाच. लोकप्रतिनिधींना निवडून देतात विविध समाजाचे लोक मतदान करतात. त्यामध्ये मराठा समाजही असून त्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे त्यांचीही अपेक्षा असणारच, कुठेतरी न्याय द्या. तो देऊ शकला नाहीत तर लोकांनी काय करायचे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

तुम्हाला माहितीय? 15 व्या शतकातील चीनी कलाकृतीच्या Porcelain Bowl ची किंमत $500,000 डॉलर्स इतकी आहे!

राजकारण इतके भिनलेले आहे, की राजकारण राजकारण म्हणत-म्हणता त्या पलिकडे गजकरण झाले आहे. सगळ्यांना एकत्र यायला काय करायचे. आम्ही सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला त्यासाठी बैठक घेतली. पण ते आले नाहीत. त्यामुळे ज्या लोकांनी मतदान केले ते त्यांना जागा दाखवतील. मराठा आरक्षणाबाबत कोणी नेतृत्व करायचे म्हटले की, उदयनराजेंचे नाव समोर येते. तुम्हाला वाटते का यातून आरक्षण प्रश्नावर मार्ग निघेल या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, रक्तपात हाच एक मार्ग आहे आणि हा होणारच. कारण, सर्वत्र बेकारी वाढणार  आहे. त्यामुळे अशा सर्व गोष्टी होणारच. पोलिसही काहीही करू शकणार नाहीत. हा इतका सोपा विषय नाही. आरक्षण ठेवायचे असेल तर आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये ठेवा. मुस्लिम, सिंधी, गुजर या लोकांसाठीही ठेवा. आर्मीमध्ये कोण जाते मराठा, रजपूत व शिख हे जातात. हे सगळे सीमेवर आहेत. त्याचा परिणाम यांच्या मनावर होणारच ना. मग तुमच्या देशाच्या सीमेचे कोण रक्षण करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top