esakal | आंब्याच्या झाडाखाली बसून उदयनराजेंचे 'भीक मागो' आंदोलन; Lockdown ला खासदारांचा तीव्र विरोध
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

शासनाच्या लॉकडाउन विरोधात खासदार उदयनराजे भोसले यांनी आज दुपारी पोवई नाका येथे आंदोलन केले.

आंब्याच्या झाडाखाली बसून उदयनराजेंचे 'भीक मागो' आंदोलन; Lockdown ला खासदारांचा तीव्र विरोध

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : शासनाच्या लॉकडाउन विरोधात खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (शनिवारी) दुपारी पोवई नाका येथे आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत त्यासमोरील आंब्याच्या झाडाखाली पोतं टाकून बसत थाळी ठेवून भीक मागो आंदोलनास प्रारंभ केला. यावेळी उदयनराजे यांनी सचिन वाझे प्रकरणासह इतर सर्वच विषयांवर राज्य सरकारवर टीका केली. 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुकारलेल्या दोन दिवसीय पूर्ण लॉकडाउनला साताऱ्यात आज सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी लॉकडाउनला जिल्ह्याच्या विविध भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्‍यक सेवा सोडून इतर सर्व व्यवहार, वाहतूक व्यवस्था बंद राहिल्याने सर्वत्र सामसुम दिसत होती. मात्र, या लॉकडाउनला साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. येथील पोवई नाक्यावर त्यांनी हातात थाळी घेऊन प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाउनचा निषेध केला. त्यानंतर उदयनराजेंनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत फेरफटका मारत शासनाच्या तुघलक्या कारभाराचाही निषेध व्यक्त केला.

Corona Virus शनिवार आणि रविवारीच बाहेर येतो का?; खासदार उदयनराजेंचा सरकारला सवाल

या आंदोलनामुळे साताऱ्यातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. भीक मागो आंदोलन करत जमा केलेले 450 रुपये घेऊन उदयनराजे यांनी चालत जिल्हाधिकारी कार्यालय गाठत ती रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रतिनिधीकडे जमा केली. गोरगरीब जनतेच्या पाठीशी मी कायम उभा राहणार असून राज्य शासनाने वीकेंड लाकडाउनचा पूनर्विचार करावा, असेही उदयनराजेंनी शेवटी स्पष्ट केले.  

जिल्ह्यातील टोलनाक्‍यांवर MH11-MH50 वाहनांना टोलमाफी द्या : आमदार शशिकांत शिंदे

जावळीतील गावांचा पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लावणार : शिवेंद्रसिंहराजे

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top