सातारा जिल्ह्यातून 'डेंगी'ने काढला पळ; आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना मोठं यश

Satara Latest Marathi News, Satara News
Satara Latest Marathi News, Satara News

सातारा : डेंगीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने वेळोवेळी जनजागृती व सर्व्हे केला जात आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात डेंगीचे 448 रुग्ण आढळले होते. मात्र, त्या तुलनेत 2019-20 मध्ये केवळ 99 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे डेंगीच्या प्रादुर्भावाला जिल्ह्यात आळा बसला आहे. 

जिल्ह्यात 2018-19 मध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने डेंगीच्या प्रादुर्भावाने थैमान घातले होते. त्यानंतर हिवताप कार्यालय व जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने दक्षता घेत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात आला. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती केल्याने डेंगीच्या रुग्णसंख्येला "ब्रेक' लागला आहे. तसेच ज्या ठिकाणी रुग्ण आढळले, त्या परिसरात आरोग्य विभागातर्फे तपासणी मोहीम राबवित उपाययोजना करण्यात आल्या. 

डेंगीचे डास स्वच्छ पाण्यात अंडी घालत असल्याने घरातील पिण्याची भांडी नियमित स्वच्छ करा. आठवड्यातून एक दिवस पाण्याची भांडी कोरडी ठेवा. शिवाय घराच्या छतावर किंवा इतर ठिकाणी पाणी साचून ठेवू देऊ नका, पाणी साठविण्यात आलेली भांडी योग्य पध्दतीने झाकून ठेवणे, घराभोवती व परिसरामध्ये सांडपाणी साचू न देणे, साचलेली डबकी वाहती करणे, खिडक्‍यांना जाळ्या बसविणे, सर्व पाणीसाठ्यांना घट्ट झाकण बसविणे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, परिसरातील खराब टायर, फुटके प्लॅस्टिक कॅन, डबे नष्ट करावेत आदी उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांत दाखल होणाऱ्या डेंगी तापसदृश रुग्णांची माहिती हिवताप कार्यालयाकडे नोंदविणे आवश्‍यक असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. 

दर महिन्याला 50 हजार घरांचा सर्व्हे 

डेंगीचा प्रादुर्भाव वाढू न देण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी जिल्हाभरात दर महिन्याला 50 ते 55 हजार घरांचा सर्व्हे करून तपासणी मोहीम राबविण्यात येत असल्याने गेल्या वर्षी डेंगीच्या रुग्णसंख्येचे प्रमाण कमी झाले आहे. 

डेंगीची लक्षणे... 

  • तीव्र ताप येणे व डोके दुखणे 
  • सांधे व अंगदुखी 
  • अंगावर लालसर पुरळ येणे 
  • डोळ्यांच्या आतील बाजूस दुखणे 
  • रक्तातील पांढऱ्या पेशी कमी होणे 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com