esakal | वाई, महाबळेश्‍वरात विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; 67 हजारांचा दंड वसूल
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

शहर आणि ग्रामीण भागातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन रस्त्यावर उतरले आहे.

वाई, महाबळेश्‍वरात विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; 67 हजारांचा दंड वसूल

sakal_logo
By
Team eSakal

वाई (जि. सातारा) : शहर आणि ग्रामीण भागातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन रस्त्यावर उतरले आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची धडक मोहीम महसूल, पोलिस व पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने राबविली. या कारवाईत एकूण 55 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. 

पालिका हद्दीत तसेच ग्रामीण भागात यशवंतनगर, भुईंज या ठिकाणी बाजारपेठेत व मुख्य चौकात ही कारवाई करण्यात आली. काही दुकानांसमोर गर्दी आढळल्याने व सामाजिक अंतर न राखल्याने सात दिवस दुकान बंद ठेवण्याच्या नोटिसा दुकानदारांना बजावण्यात आल्या. बावधन रस्त्यावरील एका कार्यालयावर धार्मिक कार्यात मर्यादेपेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर तसेच पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. तालुक्‍यात व शहरात बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगसह विविध नियम पळून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

CoronaUpdate : चिंताजनक! साताऱ्यात मृत्यूचे प्रमाण वाढले; कऱ्हाड, फलटण, खटावची हाॅटस्पाॅटकडे वाटचाल

कोरोनाचे नियम मोडणारांवर पथकाचे लक्ष 

महाबळेश्वर : कोविडचा संसर्ग टाळण्यासाठी जाहीर केलेले नियम न पाळणाऱ्या दुकानदार व नागरिकांविरोधात पालिका प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेंतर्गत काल एकाच दिवशी 12 हजार रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली. शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अनेक महिन्यांनंतर शहरात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या शंभराच्या घरात पोचली आहे. अशा वेळी कोरोनाची साखळी तोडण्याचे कठीण आव्हान प्रशासनासमोर आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी शासनाने नियम जाहीर केले आहेत. 

असं मरण्यापेक्षा जेलमध्ये बसलेलं बर; व्यापा-यांची भावना समजून घ्या : शिवेंद्रसिंहराजे 

या नियमांचे उल्लंघन करणारांवर प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेने शहरात स्पिकरवरून वारंवार दिला होता. तरीही काही दुकानदार या नियमांकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे पालिका, पोलिस व महसूल विभागाच्या विशेष पथकाने बाजारपेठेत कारवाई केली. तीन दुकानदारांकडून प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मास्क न घालता बाजारपेठेत फिरणाऱ्या सहा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये दंड वसूल केला. या पथकाने एकाच दिवसात 12 हजारांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती पल्लवी पाटील यांनी दिली. 

साताऱ्यात कोरोनाचा विस्फोट! जिल्हाधिकाऱ्यांनी काढला कडक निर्बंधाचा आदेश; जाणून घ्या काय सुरु, काय बंद..

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top