esakal | मलकापुरात कडक निर्बंध! विनामास्क फिरणाऱ्या 22, तर सामाजिक अंतर न पाळणाऱ्या 15 दुकानदारांवर कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

मलकापुरात पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मास्क न वापरणाऱ्या नागरिक व दुकानांमध्ये गर्दी करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई केली.

मलकापुरात कडक निर्बंध! विनामास्क फिरणाऱ्या 22, तर सामाजिक अंतर न पाळणाऱ्या 15 दुकानदारांवर कारवाई

sakal_logo
By
राजेंद्र ननावरे

मलकापूर (जि. सातारा) : येथील पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मास्क न वापरणाऱ्या नागरिक व दुकानांमध्ये गर्दी करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई केली. विनामास्क फिरणाऱ्या 22 जणांवर, तर सामाजिक अंतर न पाळणाऱ्या 15 व्यावसायिकांकडून सुमारे 20 हजार 850 रुपयांचा दंड वसूल केला. मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांनी स्वत: रस्त्यावर उतरून ही कारवाई केली. 

संबंधित व्यवसायिकांना समज देवून दुसऱ्यांदा दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात येणार असून मोहीम चालू राहणार असल्याचेही श्री. मर्ढेकर यांनी सांगितले. मलकापूर भागात गर्दी वाढत असून तालुक्‍यातून अनेक लोक शहरात वेगवेगळ्या कामासाठी येतात. त्यातील बरेच जण विनामास्क असतात. त्यावर पालिकेच्या विशेष पथकाने कारवाईचा बडगा उगारला. ढेबेवाडी फाटा येथे विनामास्क आढळलेल्यांवर दंडात्मक कारवाई केली. 

How’s The Josh : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मेढ्यातल्या दोन भावांची भारतीय नौदलात निवड

सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री आठपर्यंत ही विशेष मोहीम सुरू होती. शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर विनामास्क दिसणारांना अडवले जात होते. विशेष म्हणजे गर्दीत, बाजारपेठेत फिरताना मास्क न वापरणारे पालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत होते. मलकापूरचा मुख्य रस्ता, मलकापूर फाटा, कृष्णा रुग्णालय परिसर, ढेबेवाडी फाटा ते आगाशिवनगरमधील नागरिक व दुकानात गर्दी करणाऱ्यांवर कारवाई केली. या मोहिमेमध्ये श्री. मर्ढेकर यांच्यासह ज्ञानदेव साळुंखे, रामचंद्र शिंदे, राजेश काळे, उमेश खंडाळे, रमेश बागल, अधिकराव कदम, मनोहर पालकर, शशिकांत राजे, रामदास तडाखे, सुनील शिंदे यांनी भाग घेतला. 

सातारकरांनाे! कोरोना चाचणीपासून ते प्लाझ्मा मिळण्यापर्यंतची महत्वाची माहिती जाणून घ्या एका क्लिकवर 

साताऱ्यात प्रामाणिकतेचे दर्शन! सासपडेच्या शिक्षकाने सापडलेल्या मोबाईलसह रोख रक्कम केली परत

वनाधिकाऱ्यांकडून अपमान; ग्रामस्थांसह महावितरणचे अधिकारी कर्मचाऱ्यांत संताप 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top