esakal | एकरकमी एफआरपी न दिल्यास 'सह्याद्री'वर धरणे; राजू शेट्टींचा सहकारमंत्र्यांना कडक इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

उसाला एकरकमी एफआरपी मिळावी, यासाठी यंदाचा हंगाम सुरू झाल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आग्रही भूमिका घेतली आहे.

एकरकमी एफआरपी न दिल्यास 'सह्याद्री'वर धरणे; राजू शेट्टींचा सहकारमंत्र्यांना कडक इशारा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड (जि. सातारा) : राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी मिळवून देणे, ही सहकारमंत्र्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी 22 मार्चला सह्याद्री कारखान्यावरील ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या पुतळ्याजवळ बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज येथे दिला. 

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन करण्यासाठी शेट्टी आज येथे आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, "उसाला एकरकमी एफआरपी मिळावी, यासाठी यंदाचा हंगाम सुरू झाल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आग्रही भूमिका घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. सांगली जिल्ह्यातील तीन-चार कारखाने वगळता अन्य कारखान्यांनी शब्द फिरवला आणि 2500 रुपये दिले. राज्यातील इतर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिलीच नाही. त्यासंदर्भात दोन आठवड्यांपूर्वी आयुक्तांना एकरकमी एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई न केल्यास मोठे आंदोलन करू.''

Breaking News : प्रभाकर घार्गे, मनोज घोरपडे, संग्राम घोरपडेंसह 20 जणांवर खुनाचा गुन्हा 

आयुक्तांनी 60 टक्‍क्‍यांपेक्षा ज्या कारखान्यांनी एफआरपी थकीत केली आहे, त्या 13 कारखान्यांवर आरआरसीची कारवाई सुरू केली आहे. ज्या कारखान्यांनी 40 टक्के एफआरपी थकीत केली आहे, त्या कारखान्यांवरही कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी मिळवून देण्याची जबाबदारी सहकारमंत्र्यांवर असताना त्यांच्या नेतृत्वाखालील कारखान्याने एफआरपी दिलेली नाही. ज्या सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका लागल्या आहेत, त्या कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिलेली नसेल तर विद्यमान संचालक मंडळाला निवडणूक लढवण्याचा अधिकार येतोच कसा? त्यांचे अर्ज अपात्र ठरले पाहिजेत, अशी मागणी साखर आयुक्तांकडे केली आहे.

थकीत वीजबिलावरून भडका; कनेक्‍शन तोडल्यास शेतकरी संघटनांकडून होणार आसुडाचा प्रहार

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी मिळावी, यासाठी 22 मार्चला सह्याद्री कारखान्यावरील ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या पुतळ्याजवळ बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल. सहकारमंत्र्यांनी ही वेळ आणू नये, ही आमची अपेक्षा आहे.'' साखर कारखान्यातील गोवारे येथील कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणी शेट्टी यांनी साखर सम्राटांना माज आला असेल तर पोलिसांनी तो उतरावा, असे त्यांनी सांगितले. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top