esakal | How’s The Josh : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मेढ्यातल्या दोन भावांची भारतीय नौदलात निवड
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

शांत आणि संयमी स्वभावाचे हे माजी विद्यार्थी भावी पिढी स्पर्धा परीक्षेकडे विद्यार्थिदशेतच वळावी या ध्येयाने झपाटलेले आहेत.

How’s The Josh : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मेढ्यातल्या दोन भावांची भारतीय नौदलात निवड

sakal_logo
By
संदीप गाडवे

केळघर (जि. सातारा) : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित म्हाते बुद्रुक (ता. जावळी) येथील (कै.) आण्णासो पाटील माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी गणेश सुरेश शेलार व ऋषिकेश सुरेश शेलार (भोगवली तर्फ मेढा) हे दोघे बंधू प्रतिकूल परिस्थितीतही स्वयंप्रेरणेने व प्रयत्नाने नौदलात भरती झाले आहेत.
 
दररोज सहा किलोमीटर पायपीट करून विद्यालयात येऊन शिक्षण घेताना हे दोघेही एनएनएमएस, शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले, तर दहावीतही अव्वल क्रमांकावर राहिले. शांत आणि संयमी स्वभावाचे हे माजी विद्यार्थी भावी पिढी स्पर्धा परीक्षेकडे विद्यार्थिदशेतच वळावी या ध्येयाने झपाटलेले आहेत. नुकताच त्यांचा म्हाते शाळेत सत्कार करण्यात आला. गणेशने तब्बल दीड तास आपले अनुभव कथन केले. सैन्य दल, नौदल, हवाई दल व इतर स्पर्धा परीक्षांविषयी तळमळीने माहिती दिली. 

वनाधिकाऱ्यांकडून अपमान; ग्रामस्थांसह महावितरणचे अधिकारी कर्मचाऱ्यांत संताप 

मुलांना त्याची बोली भाषा भावली. मुलांना त्याचा अभिमान वाटत होता म्हणून या वेळी अनेकांनी देशसेवेसाठी वाहून घेण्याचे अभिवचन दिले. आम्हा दोघांना शाळेच्या माजी मुख्याध्यापिका खरमाटे, कुलकर्णी, माजी मुख्याध्यापक श्री. पाटील, श्री. मलवडकर, श्रीमती भिलारे, श्री. कुंभार यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्याने नमूद केले. या वेळी माजी उपसरपंच धोंडीराम सपकाळ यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन गणेशचा यथोचित सत्कार करण्यात आला. या वेळी प्रभारी मुख्याध्यापक एस. जे. कुंभार, एम. एस. मणेर, एम. पी. शिंगटे, एन. आर. भिलारे, के. जी. मंडपे, आर. एस. बादरे, विद्यार्थी उपस्थित होते. 

ग्रामस्थांनाे! उंब्रजमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, काळजी घ्या

दरोड्यातील संशयित म्हणून त्याला पोलिसांनी पकडला हाेता, पुढे काय घडले वाचा सविस्तर

चिंताजनक! ज्याची भीती होती तेच घडलं, कोरोनानं अखेर साताऱ्यातील दहा पोलिसांना गाठलं

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top