कार्वेतील अतिसाराची लागण कऱ्हाडच्या पाण्याने नाही; पालिकेचे प्रांताधिकाऱ्यांच्या नोटिशीला उत्तर

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

कऱ्हाड (जि. सातारा) : येथील माने वस्ती परिसरातून नदी पात्रात मिसळणारे सांडपाणी प्रक्रिया होऊन मिसळत आहे. नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा कोणाताही परिणाम होत नाही, असा अहवाल शासनाने नेमून दिलेल्या पाणी तपासणी करणाऱ्या यंत्रणेने पालिकेस दिला आहे. त्या आधारावर पालिकेने प्रांताधिकारी उत्तम दीघे यांना त्यांनी काढलेल्या नोटिशीला उत्तर दिले आहे. त्यामुळे कार्वे येथे पसरलेल्या अतिसाराची लागण कऱ्हाडच्या दूषित पाण्यामुळे झाली नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. 

शहरातील वाढीव हद्दीतील माने वस्ती येथील गटारातील पाणी नदी पात्रात मिसळत आहेत. ते पाणी थांबवून संबंधितांवार आरोग्य विभागाने कारवाई करावी, अशी नोटीस प्रांताधिकारी दिघे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना दिली होती. कार्वे भागात अतिसाराचे रुग्ण आढळले आहेत. ती लागण वाढीव हद्दीत गोळेश्वर लगतच्या माने वस्तीपासून गटाराचे पाणी नदीपात्रात मिसळल्याने झाल्याची तक्रार झाली आहे. त्यामुळे ती नोटीस काढण्यात आली होती.

त्यामुळे पालिकेने संबंधित तक्रारदारांसोबत जाऊन त्या भागातील पाणी तपासणीचे नमुने घेतले. त्याची तीन वेळा तपासणी केली. त्या तपासणीनुसार सांडपाणी तेथील चेंबरमध्ये मिसळत आहे. तेथे प्रक्रिया होऊन ते पाणी पुढे नदीपात्रात जात आहे. त्याची तपासणी शासनाने नेमलेल्या भारती विद्यापीठ व सेन्सो अशा दोन कंपन्यांनी केली आहे. त्या तपासणीत त्या पाण्यात कोणताही धोका नाही. शासनाने नेमून दिलेल्या नियमानुसार ते पाणी तेथील चेंबरमधून प्रक्रिया होऊन नदीत मिसळत आहे. त्यामुळे पाण्यापासून कोणताही धोका नाही, असे अहवालात म्हटले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com