मोदी सरकारविरोधात 'श्रमिक'चे महात्मा फुलेंच्या जन्मगावी आंदोलन : डॉ. पाटणकर

मोदी सरकारविरोधात 'श्रमिक'चे महात्मा फुलेंच्या जन्मगावी आंदोलन : डॉ. पाटणकर

सातारा : केंद्र सरकारचे तीन कृषी कायदे मागे घेण्याची शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे. या कृषी कायद्यांना पर्याय देण्यासाठी व दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महात्मा फुले यांच्या कटगुण या जन्मगावी शनिवारी (ता. 9) श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती "श्रमिक'चे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकाद्वारे दिली. 

शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारे कृषी कायदे रद्द झाले पाहिजेत. याबरोबरच महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिकेच्या पायावर नवे कृषी धोरण बनविण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव तयार केला पाहिजे. शेतकऱ्यांचे शोषण कायमचे संपविण्यासाठी कृषी धोरण झाले पाहिजे. वारा, सूर्यप्रकाश, समुद्राच्या लाटा, पाणी या नैसर्गिक संसाधनाचा उपयोग सामुदायिक तत्त्वावर करण्यासाठी केंद्र शासनाने 100 टक्के गुंतवणूक करून जनतेच्या ताब्यात दिले पाहिजे. शेती उत्पादन घेण्यासाठी आवश्‍यक पाणी भूमिहीन शेतकऱ्यांसह सर्वांना बंद पाइपलाइनने देण्यासाठी यंत्रणा उभी केली पाहिजे. 

राज्यात श्रमिक मुक्ती दल- पाणी संघर्ष चळवळीने 30 वर्षांच्या संघर्षातून सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील तीन तालुक्‍यांमधील सर्व कुटुंबांना शेतीसाठी पाणी देण्याची योजना राबवण्यासाठी सरकारला भाग पाडले. जंगले आणि ओढे नद्यांसारख्या प्रवाहांना पर्यावरणीय समृद्धीच्या दृष्टीने सदृढ ठेवण्यासाठी जंगल परिसरातील नदी खोऱ्यामधील आदिवासी आणि बिगर आदिवासी शेतकरी- मजुरांच्या नियंत्रणात देणे आवश्‍यक आहे. यामधून शेतकऱ्यांचे शोषण संपणार आहे. त्यामुळे शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावेत, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनात आम्ही ही भूमिका घेऊन सहभागी होणार असल्याचे श्रमिक मुक्ती दलाने म्हटले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com