सौंदर्यात भर! मराठा साम्राज्याच्या राजधानीत होणार पाच Selfi Point; राजवाड्यात 'शिल्पसृष्टी'चाही पालिकेचा मानस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

मराठा साम्राज्याची राजधानी असणाऱ्या सातारा शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. या वास्तूंमुळे साताऱ्याचा नावलौकिक सर्वदूर पोचला आहे.

सौंदर्यात भर! मराठा साम्राज्याच्या राजधानीत होणार पाच Selfi Point; राजवाड्यात 'शिल्पसृष्टी'चाही पालिकेचा मानस

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठीचे अनेक उपक्रम सातारा पालिका राबवत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून साताऱ्यातील राजवाडा परिसरासह शहरातील विविध भागांत पाच सेल्फी पॉइंट उभारण्याचा प्रस्ताव पालिकेच्या विचाराधीन आहे. यासाठी येणाऱ्या खर्चास येत्या काही दिवसांत मंजुरी मिळणार असून, त्यानंतर सेल्फी पॉइंटची कामे तत्काळ सुरू करण्यात येणार आहेत. 

मराठा साम्राज्याची राजधानी असणाऱ्या सातारा शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. या वास्तूंमुळे साताऱ्याचा नावलौकिक सर्वदूर पोचला आहे. ऐतिहासिक वास्तू, जुने तलाव, वाडे जतन आणि संवर्धन करण्यासाठीचे उपक्रम पालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहेत. सातारा पालिकेच्या मालकीच्या असलेल्या जुना राजवाडा येथे भव्य शिल्पसृष्टी उभारण्याचा पालिकेचा मानस असून, त्यासाठीची प्रशासकीय कार्यवाही पालिका पातळीवर सुरू आहे. जुन्या आणि नव्याचा मेळ घालणारी तरुणाई अलीकडे मोबाईलच्या विश्‍वात गुंतून गेली आहे. 

रिलायन्सने प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळले; टोल दरवाढीविरोधात खासदार उदयनराजे आक्रमक

सुंदर ठिकाणे, पर्यटन स्थळे आणि ऐतिहासिक ठिकाणी सेल्फी काढून ती सोशल मीडियावर अपलोड करणे हे युवापिढीचे रोजचे काम असते. लाईक्‍स, कमेंट, शेअरच्या या चक्रात अडकलेल्या या पिढीचे सेल्फीप्रेम लक्षात घेऊन सातारा पालिकेने शहराच्या विविध भागांत ऐतिहासिक बाज असणारे पाच सेल्फी पॉइंट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या सेल्फी पॉइंटसाठी काही मोठ्या उद्योजकांची मदत घेण्याबरोबरच स्वनिधिच्या तरतुदीचा निर्णय घेतला आहे. सेल्फी पॉइंट उभारताना त्याठिकाणी ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती उभारण्यात येणार आहेत. यासाठी इतिहासतज्ज्ञ, अभ्यासकांची मदत घेण्यात येणार आहे.

Honeymoon ला न जाता बायकोला अभ्यास करायला लावला अन् बायको PSI होताच नवऱ्यानं कडक सॅल्यूट ठोकला 

याबाबत पालिकेच्या बांधकाम सभापती सिद्धी पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ऐतिहासिक वास्तूंचा बाज असणाऱ्या प्रतिकृती साताऱ्यातील पाच ठिकाणे विकसित करण्यात येणार आहेत. याठिकाणचे सेल्फी पॉइंट पाहिल्यानंतर सातारकरांना, तसेच बाहेरगावच्या नागरिकांना त्याठिकाणी थांबण्याचा, सेल्फी काढण्याचा मोह अनावर झाला पाहिजे, अशा रीतीने काम करण्यावर आमचा भर राहणार असल्याची प्रतिक्रिया दिली. 

कोणाचीही गय नको, कोरोनाचे निर्बंध आणखी कडक करा : सभापती रामराजेंच्या प्रशासनाला सक्त सूचना

...येथे होणार सेल्फी पॉइंट 

जुना आणि नवा राजवाड्याजवळ, मंगळवार तळे, आनंदवाडी दत्त मंदिर, शाहूनगर, जिल्हा परिषद अध्यक्ष बंगला येथे हे सेल्फी पॉइंट होणार आहेत. सेल्फी पॉइंट उभारताना त्याठिकाणचे ऐतिहासिक महत्त्व, ऐतिहासिक सौंदर्यास बाधा पोचणार नाही, याची दक्षता पालिकेकडून घेण्यात येणार आहे. 
 
संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top