esakal | दुधेबावीत भवानीआई डोंगरात वणव्याचा भडका; वन विभागाने लावलेली अनेक झाडे जळून खाक
sakal

बोलून बातमी शोधा

दुधेबावीत भवानीआई डोंगरात वणव्याचा भडका; वन विभागाने लावलेली अनेक झाडे जळून खाक

भवानी डोंगरावर लागलेल्या वणव्याच्या आगीमध्ये गवत व वन विभागाने लावलेली अनेक झाडे जळून खाक झाली आहेत.

दुधेबावीत भवानीआई डोंगरात वणव्याचा भडका; वन विभागाने लावलेली अनेक झाडे जळून खाक

sakal_logo
By
किरण बोळे

फलटण शहर  (जि. सातारा) : दुधेबावी परिसरातील प्रसिध्द भवानीआईच्या डोंगराला वणवा लावण्याचा प्रकार घडलेला असून, दोन दिवस या वणव्याची आग या डोंगरावर भडकत आहे. त्यामुळे "नका पेटवू वणवा, जळतेय वनसंपदा' असे आवाहन या परिसरातील नागरिकांकडून होत आहे. वन विभागानेही जनजागृती करावी, अशी मागणी होत आहे. 

भवानी डोंगरावर लागलेल्या वणव्याच्या आगीमध्ये गवत व वन विभागाने लावलेली अनेक झाडे जळून खाक झाली आहेत. तर अनेक मोठ्या झाडांनाही झळा बसल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात गवत जळाल्याने परिसरातील येथे चरायला नेत असलेल्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. तसेच आगीत अनेक वनौषधी, सरपटणारे प्राणी, कीटक, तृणभक्षी, अंडी, घरटी जळून खाक होत असल्याने येथील वनसंपदाही नष्ट होत आहे. या पार्श्‍वभूमीवर परिसरात वणव्याचा प्रकार लक्षात आला तर तातडीने तो विझविण्यासाठी प्रयत्न करावेत व वन विभागाशी त्वरित संपर्क साधावा. जर कुणी वणवा लावण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा प्रवृत्तींना अटकाव करणे आवश्‍यक आहे, असे आवाहन वन विभागाने केले आहे. 

Video पाहा : द्रविड हायस्कूलच्या पेन्सिलच्या प्रतिकृतीची हाेतेय चर्चा

आम्ही शासकीय वनक्षेत्रात नियमानुसार जाळरेषा काढलेल्या असतात. मात्र, काही लोक त्या शेजारील असलेल्या शेतात पाचट वगैरे पेटवतात. त्यामुळे डोंगरांना आग लागण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. डोंगराजवळील शेतकऱ्यांनी शेतातील केरकचरा पेटवत असताना दुसरीकडे आग पसरणार नाही, याची दक्षता घ्यावी. आग लावणारे सापडल्यास त्यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा फलटणचे परिक्षेत्र वनाधिकारी मारुती निकम यांनी दिला आहे. 

रस्त्यांची चाळण अन् टोल वाढ; पुणे- बंगळूर महामार्गाकडे लक्ष द्या, नेटीझन्सची गडकरींना मागणी 

बगाड्यासह मानक-यांची पोलिसांच्या हातावर तुरी; 83 जणांना जामीन मंजूर

वनाधिकाऱ्यांकडून अपमान; ग्रामस्थांसह महावितरणचे अधिकारी कर्मचाऱ्यांत संताप 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top