esakal | खटावात मागासवर्गीय कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार; साताऱ्यात 'वंचित'ची धरणे
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

खटाव तालुक्‍यातील औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एका गावामध्ये मागासवर्गीय कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला.

खटावात मागासवर्गीय कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार; साताऱ्यात 'वंचित'ची धरणे

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : खटाव तालुक्‍यातील औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एका गावामध्ये मागासवर्गीय कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणातील संशयितांना कडक शासन करून पीडितेला न्याय द्यावा, या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे धरण्यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, सुनील कदम, गणेश भिसे, गणेश कारंडे सहभागी झाले होते. 

याबाबत घटनेतील पीडित मुलीस व कुटुंबास कोणतेही संरक्षण दिले नाही, तसेच संशयित मोकाट फिरत असल्याने पीडित कुटुंब भयभीत आहे. या प्रकरणातील संबंधितांवर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक, दक्षता समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, समाजकल्याण अधिकारी, महिला बालकल्याण समिती यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबास संरक्षणाची हमी द्यावी, तसेच गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन व्हावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खंडाईत यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. 

साताऱ्यात कोरोनाचा विस्फोट! जिल्हाधिकाऱ्यांनी काढला कडक निर्बंधाचा आदेश; जाणून घ्या काय सुरु, काय बंद..

वाढेतील हॉटेलवर सातारा पोलिसांचा छापा; जुगार खेळणाऱ्या सात बड्या व्यापाऱ्यांना अटक

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image