पुसेगाव समस्यांच्या विळख्यात, दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News Satara News

पुसेगावात काही ठिकाणी पथदिवे नसल्याने परिसर अंधारात हरवून जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पुसेगाव समस्यांच्या विळख्यात, दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

sakal_logo
By
ऋषिकेश पवार

विसापूर (जि. सातारा) : पुसेगाव (ता. खटाव) येथील विविध भागांतील वसाहती समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या आहेत. गावातील प्रभाग क्रमांक एकमधील जामदारवाडा, हवेली परिसरात गटारांची सोय नसल्याने नागरी वस्तीत सांडपाणी साचत आहे. त्यामुळे घरांच्या आजूबाजूला लहान डबकी तयार होऊन दुर्गंधी पसरत असून, आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याच प्रभागातील मातंग व बौद्ध समाजातील शेतीसाठी उपयोगी असणाऱ्या रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे या समाजातील शेतकऱ्यांना शेतीच्या दळणवळणासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. 

प्रभाग क्रमांक तीनमध्ये तर समस्यांच्या विळख्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रभागातील लेंडोरी ओढ्यात बंधाऱ्याच्या कडेला गाळ आणि अस्वच्छ पाणी साचल्याने जलपर्णी वनस्पतींचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच गावातील सांडपाणी, कचरा आदी घटक या ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर टाकले जात असल्याने या ओढ्याला गटारगंगेचे स्वरूप येऊ लागले आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यावरणासोबतच परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता 
या ओढ्याची वेळीच साफसफाई करण्याची गरज दिसत आहे.

साताऱ्याच्या पोरानं जिंकलं दिल्लीचं तख्त; यूपीएससीत प्रथमेश देशात तिसरा, तर महाराष्ट्रात पहिला!

तसेच प्रभाग क्रमांक सहामध्ये नंदीवाले वस्तीत अंतर्गत गटारे व सार्वजनिक शौचालयांची कमतरता असल्याचे येथील नागरिक बोलून दाखवत आहेत. याच प्रभागातील जय भवानी ट्रेडर्सच्या शेजारील वसाहतीला ये-जा करण्यासाठी रस्त्याची सोयच नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, गावात काही ठिकाणी पथदिवे नसल्याने परिसर अंधारात हरवून जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तरी संबंधित विभागाने तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 

कायतर म्हणे.. आम्हाला आकाश द्या, चंद्र-सूर्य तारे द्या; सदाभाऊंनी शेतकऱ्यांना फटकारले

हवेली-जामदारवाडा परिसरात गटारांची सोय नसल्याने सांडपाणी रस्त्यावर साचते. त्यातूनच नागरिकांना ये-जा करावी लागते. दुर्गंधीसोबतच डासांचे प्रमाण वाढल्याने लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रकार वाढले आहेत. 

-अमर जाधव, ग्रामस्थ, पुसेगाव 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top