साताऱ्यातील पाणीपुरवठा दोन दिवस खंडित; शहरात 'या' भागात येणार नाही पाणी!

गिरीश चव्हाण
Saturday, 16 January 2021

शहापूर योजनेच्या वीज वाहिनीचे स्थलांतर करण्याचे काम ता. 19 रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

सातारा : शहापूर पाणी योजनेच्या उच्च दाब वीज वाहिनी स्थलांतरणाचे काम महावितरणच्या वतीने हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे सातारा शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा ता. 19 आणि 20 रोजी खंडित होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
 
शहापूर योजनेच्या वीज वाहिनीचे स्थलातंर करण्याचे काम ता. 19 रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. यामुळे शहापूर योजनेतील पाणी उपसा बंद राहणार आहे. परिणामी, 19 रोजी सकाळच्या सत्रात घोरपडे टाकीच्या माध्यमातून चारभिंती टाकी, कुपर कारखाना टाकी यांना पाणीपुरवठा होणार नाही. 

साताऱ्यात कोरोनाच्या विनाशासाठी क्ष-किरण वैज्ञानिक अधिकाऱ्याने टोचून घेतली पहिली लस!

यामुळे कुंभारवाडा, लोणार गल्ली, पोवईनाका भाजी मंडई, रविवार पेठ, मल्हार पेठ, पंताचा गोट, तसेच सायंकाळी मल्हार पेठ, शेटे चौक, गुरुवार पेठेतील भागांना पाणीपुरवठा होणार नाही. ता. 20 रोजी गुरुवार पेठ टाकी, गणेश टाकी, घोरपडे टाकी, राजवाडा टाकी, बुधवार नाका टाकीच्या माध्यमातून होणाऱ्या भागातील सकाळच्या सत्रातील पाणीपुरवठा खंडित होणार आहे. या काळात नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, सभापती सीता हादगे यांनी केले आहे.

कोरोना लसीचा चांगला परिणाम जनमानसांत दिसेल; गृहराज्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Water Supply In Satara Will Be Closed For Two Days