esakal | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बेलवडे हवेलीतील युवक ठार
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बेलवडे हवेलीतील युवक ठार

रात्री उशिरापर्यंत तळबीड पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंदवण्याची प्रक्रीया सुरू होती.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बेलवडे हवेलीतील युवक ठार

sakal_logo
By
तानाजी पवार

वहागाव ( ता. कऱ्हाड) : पुणे - बंगळूर महामार्ग ओलांडणाऱ्या युवकास एका टेम्पाेने जोराची धडक दिल्याने युवक जागीच ठार झाला. पुणे-बंगळुरू महामार्गावर वराडेच्या (ता. कऱ्हाड) हद्दीत रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात प्रशांत उर्फ आप्पा तानाजी सूर्यवंशी (वय २८, रा. बेलवडे हवेली ता. कऱ्हाड) हा युवक ठार झाला.

पोलिस व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी - बेलवडे हवेली येथील प्रशांत कामानिमित्त वराडे येथे आला होता. महामार्गावर वराडे येथील एका ढाब्यासमोर रस्ता ओलांडत असताना कराड ते पुणे लेनवरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोंने त्यास जोराची धडक दिली.

त्यात प्रशांत गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी उंब्रज येथील खासगी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मृत असल्याच् घोषित केले. रात्री उशिरापर्यंत तळबीड पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंदवण्याची प्रक्रीया सुरू होती.

काेण काेणत्या Hospital बराेबर प्रशासनाची चर्चा सुरु आहे वाचा सविस्तर

हजारमाची, बाबरमाची, वनवासमाची, राजमाची, विरवडे, ओगलेवाडीकरांना हवीय सदाशिवगडावर शिवसृष्टी 

काेविड 19 रुग्णांच्या संपर्कातील लाेक जादा पैसे लागतात म्हणून Test करण्यास पुढाकार घेत नव्हते, आता RTPCR test अवघ्या किती रुपयांमध्ये हाेऊ शकते वाचा सविस्तर

बाजार सुपर स्प्रेडर ठरत असल्याने सुरक्षितता म्हणून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top