Satara : अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

जिल्ह्यात ‘एक दिवस बळिराजासाठी सुरुवात; झेडपी अधिकाऱ्यांच्या भेटी
 farmer
farmer esakal

सातारा : शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळिराजासाठी’ हा अभिनव उपक्रम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या उपक्रमात कृषीसह इतर विभागांतील अधिकाऱ्यांनी गावागावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.राज्यात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्या, नैराश्य यातून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारणे समजून घेणे, त्यासाठी सुलभ व प्रभावी कृषीविषयक धोरण तयार करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी प्रशासनाने समजून घेऊन त्यावर उपाययोजना करून निर्णय घेण्यासाठी प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत घालवून त्याच्याशी संवाद साधत येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी माझा एक दिवस बळिराजासाठी हा उपक्रम ०१ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे.

संबंधित अधिकाऱ्यांना नेमून दिलेल्या तालुक्यातील एका गावाची निवड करून तेथील शेतकऱ्यांसोबत सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक दिवस राहून त्यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधत आहेत. या उपक्रमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार असून, कृषीविषयक माहितीही मिळणार आहे.

या अधिकाऱ्यांकडे आहे जबाबदारी

या उपक्रमात असणारे अधिकारी व कंसात त्यांच्याकडील तालुके पुढीलप्रमाणे : मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत (खंडाळा), उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव (फलटण), अर्चना वाघमळे (महाबळेश्वर), किरण सायमोते (खटाव), रोहिणी ढवळे (जावळी), प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर (पाटण), माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर (कोरेगाव), कृषी विकास अधिकारी विजय माईणकर (माण), जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे (पाटण), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार (वाई), जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे (सातारा), ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे (कऱ्हाड), लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अरुणकुमार दिलपाक (खंडाळा), कार्यकारी अभियंता प्रशांत खैरमोडे (सातारा).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com