esakal | "एक गाव, एक गणपती'योजनेस पाठिंबा दिलेल्या मंडळांना वृक्षरोप भेट
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

गणेश मंडळांनी शासन आदेशाचा योग्य मान राखला म्हणून डॉ. सागर वाघ यांनी आभार व्यक्त करताना प्रत्येक मंडळाला एक वृक्षरोप भेट देण्याचा एक स्तुत्य उपक्रम सुरू केला. 

"एक गाव, एक गणपती'योजनेस पाठिंबा दिलेल्या मंडळांना वृक्षरोप भेट

sakal_logo
By
सूर्यकांत पवार

अंगापूर (जि. सातारा) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बोरगाव पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या 59 गावांत सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या आवाहनानुसार "एक गाव, एक गणपती' या संकल्पनेला पाठिंबा दर्शवून तो अंमलात आणण्याचा निश्‍चय केला आहे. या सर्व गणेश मंडळांना डॉ. वाघ यांनी एक वृक्षरोप देवून त्याच्या संगोपनाची जबाबदारी दिली आहे. 

बोरगाव पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या 59 गावांमध्ये आजमितीला अंदाजे 150 ते 200 छोटी-मोठी सार्वजनिक मंडळे आहेत. परंतु, वर्तमान स्थितीचे भान राखत या गावांतील सर्व मंडळांनी एकमुखी "एक गाव, एक गणपतीचा' नारा दिला आहे. या सर्व गावांतील मंडळांनी शासन आदेशाचा योग्य मान राखला म्हणून डॉ. वाघ यांनी आभार व्यक्त करताना प्रत्येक मंडळाला एक वृक्षरोप भेट देण्याचा एक स्तुत्य उपक्रम सुरू केला. 
सध्याची पिढी अशा उत्सवातून भरकटत चालली असून त्यांचा कल विधायक कार्याकडे वाढून त्याचा उपयोग त्या गावाला व त्या तरुणांच्या कुटुंबाला व्हावा व त्यांच्या हातून काही तरी चांगले घडावे, या उद्देशाने त्यांनी हा आदर्शवत उपक्रम सुरू केला असून, याचे संपूर्ण भागातून कौतुक होत आहे. 

दरम्यान, डॉ. वाघ यांच्या या उपक्रमाला प्रतिसाद देत येथील भवानीनगर मित्रमंडळाने स्वखर्चाने शोभेची व सावली देणारी रोपे आणत संपूर्ण मंडळ परिसरात त्यांचे रोपण केले असून, येत्या काळात गावातील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्याचे व त्या रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारी प्रत्येक लहान-मोठ्या कार्यकर्त्याने स्वीकारली आहे. 

(संपादन : पांडुरंग बर्गे)  

loading image
go to top