Satara News: प्रधानमंत्री आवास योजनेत धनदांडग्‍यांची नावे Satara Patan Pradhan Mantri Awas Yojana Names beneficiaries | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pradhan Mantri Awas Yojana Satara News

Satara News : प्रधानमंत्री आवास योजनेत धनदांडग्‍यांची नावे

मल्हारपेठ : प्रधानमंत्री आवास योजनेत पाटण तालुक्यातील प्रत्येक गावात पात्र अपात्र याद्यांवरून गावपातळीवर वादावादीचे प्रसंग घडत आहेत.

कारण शासनस्‍तरावर सर्वेक्षण होऊनही अनेकांनी नानाविध क्लृप्त्या लढवून पक्के घर असतानाही आजूबाजूला असणारे शेड जुने घर ग्रामपंचायत दप्तरी नोंदवून घरकुलास पात्र ठरले असल्‍याने अनेक गरजू कुटुंब वंचित राहणार आहेत.

दरम्यान, लाभार्थींचा समावेश हा स्थानिक ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या ठरावानुसार निश्चित केला जात आहे. यामध्ये पक्के घर नसणे, आर्थिक सक्षम नसणे, अल्पभूधारक, कमी उत्पन्नगटांतील, अपंग, निराधार, महिला परितक्त्या, दारिद्र्यरेषेखाली कुटुंब असे सर्व निकष विचारात घेऊन लाभार्थी निवडण्‍याचा अधिकार हा ग्रामसभेशिवाय

आर्थिक सर्वेक्षणानुसार निश्चित करण्‍याचा अधिकार हा त्या-त्या पंचायत समिती विभागातील तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतर ठरवला जातो, तशा आशयाचे ठराव आणि तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार आतापर्यंत तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थी संख्या ग्रामपंचायतींना पाठवण्यात आली आहे.

प्रत्येक गावात यादी वाचनावेळी आक्षेप घेण्‍यात आला. मात्र, काही गावांत अपात्र लोकांनाही यामध्ये पात्र करण्‍याचे ठराव घेण्‍यात आले. मात्र, यावर शासनस्‍तरावरच निर्णय होऊ शकतो.

अपात्र लाभार्थींना पात्र ठरवणेचा अधिकार ग्रामसभेस नाही, असे सांगण्यात आले. याचा अर्थ हे लाभार्थी निवडताना राजकीय हस्तक्षेप झाल्याचे समोर येत आहे.शासनस्‍तरावर या पात्र लाभार्थींचे फेर सर्वेक्षण करण्याची मागणी अनेक सुज्ञ ग्रामस्थांतून होत आहे.(Marathi Tajya Batmya)

ज्या गावात पात्र अपात्र यादी वाचनाच्या ग्रामसभा झाल्या नाहीत, त्यांनी याबाबत तक्रार नोंदवावी. माहिती घेऊन संबंधित अध्यक्ष, सचिव यांच्यावर कारवाई करण्‍यात येईल. (Latest Marathi News)

शिवाय ज्यांची नावे समाविष्ट झाली नाहीत, अशा लाभार्थींनी तक्रार करावी. त्या-त्या गावची माहिती घेऊन संबंधित ग्रामपंचायतीचे म्हणणे घेऊन याबाबत पुन्‍हा विचार होऊ शकतो.