सातारा : विनयभंग केल्याप्रकरणी पिंप्रदच्या एकास सक्तमजुरी

पोलिसांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते
hard labor
hard laborsakal

सातारा : फलटण तालुक्यातील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पाचवे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. जी. नंदीमठ यांनी एकाला एक महिन्याच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. बापूराव शंकर भगत (रा. पिंप्रद, ता. फलटण) असे त्याचे नाव आहे. जानेवारी २०१८ मध्ये चालत जात असताना भगतने विनयभंग केल्याची फिर्याद संबंधित महिलेने फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. न्यायाधीश नंदीमठ यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली.

साक्षीदारांच्या साक्षी व सहायक सरकारी वकील महेश शिंदे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश नंदीमठ यांनी भगतला एक महिना सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड व दंड न दिल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. पोलिस प्रॉसिक्यूशन स्कॉडचे उपनिरीक्षक राजेंद्र यादव, हवालदार शमशुद्दीन शेख, जी. एच. फरांदे, रेहाना शेख, राजेंद्र कुंभार, अश्विनी घोरपडे, अमित भरते यांनी सरकारी वकिलांना सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com