
सातारा : तेरा हजार बीजगोळ्यांचे रोपण
मायणी : येथील भारतमाता विद्यालय व वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी वन संवर्धनदिनानिमित्त ओसाड माळरानावर सुमारे १३ हजार बीजगोळे व बियांचे रोपण केले. या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
येथील फ्रेंड्स ग्रुप सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आणि उपक्रमशील शिक्षक महेश जाधव यांच्या संकल्पनेतून वन संवर्धनदिनी बीजगोळ्यांचे रोपण करण्यात आले. दरम्यान, उन्हाळी सुटीला जातानाच दोन्ही शाळांतील मुला-मुलींना बिया संकलन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. पंधरा दिवसांपूर्वी सर्व विद्यार्थ्यांना बीजगोळे तयार करण्याचे मार्गदर्शन करीत प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घरीच शक्य तेवढे अधिकाधिक बीजगोळे तयार केले. वन संवर्धनदिनाचे निमित्त साधून त्या बीजगोळ्यांचे रोपण करण्याचे निश्चित करण्यात आले.
विद्यार्थी दशेपासूनच पर्यावरणासंबंधी जागरूकता निर्माण होण्यासाठी शाळांनी असे उपक्रम राबविणे व ते यशस्वी करणे आवश्यक आहे.
- महेश जाधव, शिक्षक, भारतमाता विद्यालय, मायणी
Web Title: Satara Plantation Thirteen Thousand Seeds
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..