Satara : ६५ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त

नोव्हेंबर २०२२ पासून आतापर्यंत जिल्हा पोलिसांनी देशी बनावटीच्या एकूण ३२ बंदुका व ४० काडतुसे जप्त केली आहेत.
Satara gun
Satara gunsakal

सातारा - पोलिस यादीवरील संशयिताकडून स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेषण विभागाने (एलसीबी) देशी बनावटीचे पिस्तूल जप्‍त केले आहे. हितेश सुरेश मानकर असे त्याचे नाव आहे. मानकर हा दुचाकीवरून शिरवळ (ता. खंडाळा) येथे येणार असल्‍याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्‍यानुसार सापळा लावून त्याला थांबविण्यात आले.

अंगझडतीमध्ये त्‍याच्याकडे ६५ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल सापडले. त्याच्यावर शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे. नोव्हेंबर २०२२ पासून आतापर्यंत जिल्हा पोलिसांनी देशी बनावटीच्या एकूण ३२ बंदुका व ४० काडतुसे जप्त केली आहेत.

Satara gun
Mumbai : पावसाळी आजारांना रोखा; प्रभावी उपायोजना राबवा; पालिका आयुक्तांचे यंत्रणांना आवाहन

पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अरुण देवकर, सहायक निरीक्षक संतोष पवार, रवींद्र भोरे, उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे, मदन फाळके, मधुकर गुरव, सहायक फौजदार उत्तम दबडे, हवालदार संतोष पवार, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे हे या कारवाईत सहभागी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com