सातारा जिल्ह्यात आढळली काेराेना बाधित पोलिस अधिकारी

सातारा जिल्ह्यात आढळली काेराेना बाधित पोलिस अधिकारी

उंब्रज ः मुंबईहून येथील कृष्णानगर येथे आलेल्या 29 वर्षीय महिला पोलिस अधिकारी कोरोना बाधित झाल्याचा अहवाल आल्याने येथे चिंतेत भर पडली आहे. पोलिस प्रशासनाने संबंधित बाधित राहात असलेला परिसर रात्री सील केला आहे.

दरम्यान, परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांबाबत येथील स्थानिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार यांनी केले आहे.

उंब्रजमध्ये आणखी रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये संबंधित बाधित महिला मुंबई येथे पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत आहे. शुक्रवारी त्या जिल्ह्यात आल्या होत्या. रविवारी त्यांना ताप, घशाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेल्या होत्या. 

तिव्र लक्षणे असल्याने त्यांना तातडीने कऱ्हाड येथे उपचारासाठी पाठविण्यात आले होते. काल रात्री त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याची माहिती मिळाल्यानंतर उंब्रजमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर डॉ. कुंभार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

त्यानंतर जवळच्या संपर्कातील हाय रिस्कमधील दीड वर्षाच्या बाळासह अन्य
चार जणांना कऱ्हाड येथे इन्स्टिट्यूट क्वारंटाइन केले आहे. तर, घराशेजारील व नातेवाईक अशा दहा जणांना होम क्वारंटाइन केल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंभार यांनी सांगितले.

दरम्यान, उंब्रजसह परिसरातील नागरिकांना परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांकडून कोरोनाचा अधिक धोका असल्याने नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगावी, परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी होम क्वारंटाइनचे निकष काळजीपूर्वक पाळावेत, असे आवाहन येथील सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com