esakal | मदनरावांनी उचलले भोसलेंच्या प्रचाराचे 'शिवधनुष्य'; डॉ. इंद्रजित मोहितेंच्या चुप्पीने संभ्रम, कार्यकर्तेही बुचकुळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

मोहिते गटाचे नेते मदनराव मोहिते हे भोसले गटात समील होऊन त्यांनी भोसलेंच्या प्रचाराचे शिवधनुष्य उचलले आहे.

मदनरावांनी उचलले भोसलेंच्या प्रचाराचे 'शिवधनुष्य'; डॉ. इंद्रजित मोहितेंच्या चुप्पीने संभ्रम, कार्यकर्तेही बुचकुळ्यात

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : शिवनगर येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत अविनाश मोहिते आणि भोसले गटाकडून झालेल्या आरोप-प्रत्यारोपाने वातावरण ढवळून निघाले असताना कारखान्याचे माजी अध्यक्ष व मोहिते गटाचे नेते डॉ. इंद्रजित मोहिते शांत आहेत. त्यांनी कोणतीच जाहीर भूमिका घेतलेली नसल्याने त्यांचा गटही संभ्रमावस्थेत आहे. 

मोहिते गटाचे नेते मदनराव मोहिते हे भोसले गटात समील होऊन त्यांनी भोसलेंच्या प्रचाराचे शिवधनुष्य उचलले आहे. त्यावरही डॉ. मोहिते व्यक्त झालेले नाहीत किंवा कोणतीच स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे कार्यकर्तेही बुचकुळ्यात आहेत. कृष्णा कारखान्याची वार्षिक सभा नेहमी वादळी ठरते. यंदा ऑनलाइनमुळे सभा शांततेत झाली. मात्र, दोन्ही गटांच्या आरोप- प्रत्यारोपांनी वातावरण ढवळले. त्या सगळ्यात मोहिते गटाचे नेते डॉ. इंद्रजित मोहिते अलिप्त आहेत. त्यांचा अलिप्तपणा बऱ्याच गोष्टी स्पष्ट करणारा असला, तरी गटातील समर्थकांना तो संभ्रमावस्थेत टाकणारा आहे. 

प्रतिवर्षाप्रमाणे बावधनची बगाड यात्रा उत्साहात; प्रशासनाच्या नियमांना ठेंगा

त्यापूर्वीच दोन दिवसांपूर्वी मोहिते गटाचे नेते मदनराव मोहिते भोसले गटाच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. श्री. मोहिते यांनी शेणोलीच्या जाहीर सभेत डॉ. सुरेश भोसले यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. त्यावरही चकार शब्दाचीही प्रतिक्रिया डॉ. मोहिते यांनी दिलेली नाही. वार्षिक सभा झाली त्यावरही जाहीर काहीही प्रतिक्रिया नाही, मदनदादांची भोसले गटाकडून एन्ट्री झाली. त्यावरही काहीही प्रतिक्रिया नाही, अविनाश मोहिते- डॉ. मोहिते यांच्या एकत्रीकरणावरही डॉ. मोहिते यांची काहीही प्रतिक्रिया नाही. त्यामुळे डॉ. मोहिते यांचा कृष्णा काठावरील समर्थकच सध्या बुचकुळ्यात पडला आहे.  

अकलूजच्या मोहिते-पाटलांचा नीरा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचे भूत पुन्हा जनतेच्या मानगुटीवर बसविण्याचा प्रयत्न

थोडे थांबा अन्‌ पाहा... 

डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांचे एकत्रीकरण सुरू आहे. त्याबाबत परवा झालेल्या पत्रकार परिषदेत अविनाश मोहिते यांना छेडले असता श्री. मोहिते यांनी थोडे थांबा आणि पाहा असे उत्तर दिले. त्याच वेळी महाविकास आघाडी कृष्णात झाली, तर ती मान्य असेल काय, यावरही श्री. मोहिते यांनी थांबा अन्‌ पाहा असेच उत्तर दिले. त्यामुळे कृष्णाच्या रणांगणात राजकीय हालचाली गतिमान होत आहेत, असेच म्हणावे लागेल.

अविनाश मोहितेंना तुरुंगात टाकण्याचे पाप डॉ. सुरेश भोसलेंनी केलं; भारती विद्यापीठाच्या उपाध्यक्षांचा गंभीर आरोप

केंद्राला सहकारी साखर कारखानदारी मोडीत काढायची आहे का?; गृहराज्यमंत्र्यांचा मोदी सरकारला सवाल

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top