esakal | 'सारथी' बंद करण्यास उपमुख्यमंत्रीच जबाबदार; सेनेच्या नेत्याची अजित पवारांवर सडकून टीका

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

मराठा आरक्षणासाठी न्यायालयात महाआघाडी शासनाने योग्य युक्तिवाद न केल्याने त्यास स्थगिती मिळाल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला.

'सारथी' बंद करण्यास उपमुख्यमंत्रीच जबाबदार; सेनेच्या नेत्याची अजित पवारांवर सडकून टीका

sakal_logo
By
जालिंदर सत्रे

पाटण (जि. सातारा) : तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने सारथी, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ, छत्रपती शाहू शिष्यवृत्ती अशा योजनांतून मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजकीय हेतूने सारथी बंद केले. त्यातील 352 मराठा बांधवांच्या नोकऱ्या गेल्या. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, तर अण्णासाहेब पाटील महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यास मंत्री अशोक चव्हाण जबाबदार आहेत, असा आरोप माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी आज येथे केला. 

मराठा आरक्षणासाठी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला मुंद्रुळकोळे ग्रामस्थांसह नरेंद्र पाटील यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले,"" माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी 1980 मध्ये आरक्षणासंदर्भात राज्यभर जनजागृती केली. 22 मार्च 1980 ला मंत्रालयावर भव्य मोर्चा काढला. मात्र, तत्कालीन कॉंग्रेस सरकारने दबाव टाकला. त्यातच त्यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्यानंतर कोपर्डी येथील मराठा समाजाच्या युवतीवर अत्याचार झाले आणि संपूर्ण मराठा समाज एकवटला. त्याची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यास न्यायालयात आव्हान दिले आणि आरक्षणाचा लढा न्यायालयीन कक्षेत गेला. 

हे पण वाचा- बोंबला! इंदोलीतील लग्नासाठी कोरेगाव तालुक्यातून एकजण आला अन् चारजणांना सोबत घेऊन पॉझिटीव्ह झाला

मात्र, तत्कालीन फडणवीस सरकारने सारथी, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ, छत्रपती शाहू शिष्यवृत्ती अशा योजनांतून मराठा समाजाला न्याय दिला. परंतु, राजकीय हेतूने सारथी बंद केले. त्यातील 352 मराठा बांधवांच्या नोकऱ्या गेल्या. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, तर महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त होण्यास मंत्री अशोक चव्हाण जबाबदार आहेत.'' मराठा आरक्षणासाठी न्यायालयात महाआघाडी शासनाने योग्य युक्तिवाद न केल्याने त्यास स्थगिती मिळाली, असा आरोप करून श्री. पाटील म्हणाले," 20 दिवस अनेक गावांतून आंदोलनाला पाठिंबा मिळाला. मंत्री शंभूराज देसाई येऊन गेले. पण, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य फिरकले नाहीत.'' 

हे ही वाचा- घ्यायला गेले राष्ट्रवादींतर्गत गटबाजीचा फायदा; स्वकीयांनीच दाखविला कात्रजचा घाट 

मी अजूनही शिवसेनेतच 

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षात न घेता मला (कै.) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची जबाबदारी दिली होती, असे स्पष्ट करून नरेंद्र पाटील म्हणाले,"" लोकसभा मी शिवसेनेच्या माध्यमातून लढलो असून, आजही मी अधिकृतपणे शिवसेनेतच आहे.'' 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे