esakal | सातारा जिल्ह्यात 756 गावांत 'महिला राज'; 659 गावे खुल्या प्रवर्गासाठी

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News Satara Politics News

डिसेंबर महिन्यात एक हजार 495 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. स्थानिक गटांत समझोता झाल्याने अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.

सातारा जिल्ह्यात 756 गावांत 'महिला राज'; 659 गावे खुल्या प्रवर्गासाठी
sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : जिल्ह्यातील एक हजार 495 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत आज झाली. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर आता गावोगावी पुन्हा एकदा सरपंचपदाच्या गुलालाची उधळण होणार असून, खुल्या प्रवर्गाचे आरक्षण असलेल्या गावांमध्ये यानिमित्ताने गटबाजीला उधाण येणार आहे. एकूण ग्रामपंचायतींपैकी 756 गावांच्या सरपंचपदी विविध प्रवर्गातील महिला विराजमान होणार असून, उर्वरित 659 गावांचे सरपंचपद विविध प्रवर्गासाठी खुले झाले आहे. 

डिसेंबर महिन्यात एक हजार 495 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. स्थानिक गटांत समझोता झाल्याने अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. बिनविरोध ग्रामपंचायती वगळून 878 ठिकाणच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली. निकालानंतर सर्वांचे लक्ष सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लागून राहिले होते. त्यानुसार आरक्षणाची सोडत आज साताऱ्यासह तालुक्‍यांच्या ठिकाणी पार पडली. एकूण ग्रामपंचायतींपैकी 756 गावांच्या सरपंचपदी विविध प्रवर्गातील महिला विराजमान होणार असून, उर्वरित 659 गावांचे सरपंचपद विविध प्रवर्गासाठी खुले झाले आहे. 

आमचे खास बंधू.. म्हणत उदयनराजेंकडून शिवेंद्रसिंहराजेंचं कौतुक; संभाजीराजेंच्या अनुपस्थितीची सातारकरांना हुरहुर

सरपंचपद खुल्या असणाऱ्या गावांमध्ये या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय दंगल उडणार आहे. कोरेगाव तालुक्‍यातील सातारारोड, देऊर, किन्हई ही राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावे खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाली आहेत. त्याचबराबेरच वाई तालुक्‍यातील धोम, बोपर्डी, बोपेगाव येथील सरपंचपद खुले राहिले आहे. जावळी तालुक्‍यातील सर्वात मोठ्या कुडाळ ग्रामपंचायतीचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असून, मतदारांच्या कौलामुळे येथील राजकीय परिस्थिती त्रिशंकू बनली आहे. 

अण्णासाहेब शिंदे असते, तर शेतकऱ्यांवर ही वेळ आलीच नसती; पवारांचा केंद्रावर निशाणा

कऱ्हाड तालुक्‍यातील उंब्रज, सैदापूर, कोपर्डे हवेली येथील सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी, तर उंडाळे, पार्ले, चोरे, ओंड येथील सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. महाबळेश्‍वर तालुक्‍यातील भिलार, तळदेव, क्षेत्र महाबळेश्‍वर येथील सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले राहिले. साताऱ्यातील कोडोली, कोंडवे, मत्यापूर, फत्यापूर, करंडी, परळी ही गावे सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाली. सातारा तालुक्‍यातील 195 पैकी 98 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या खुर्चीवर महिला विराजमान होणार आहेत. माणमधील गोंदवले बुद्रुक, कुकुडवाड, बिदाल, लोधवडे ही गावे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपने अनेक ग्रामपंचायतींमध्ये बहुमत मिळवल्याचे दावे केले होते. निकालाच्या निमित्ताने उडालेला गुलाल खाली बसत असतानाच सरपंचपदाच्या सोडतीमुळे गावपुढारी पुन्हा एकदा गुलालाची उधळण करण्याच्या तयारीला लागले आहेत.

काळ आला होता,पण वेळ आली नव्हती; सुसाट गव्याने दुचाकीस्वारास उडविल्यानंतरही युवकाचा वाचला जीव  

बहुमत असूनही सरपंचपद विरोधी गटाकडे

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीत अनेक ठिकाणी बहुमत असले, तरी सरपंचपदाचे आरक्षण विरोधी गटाला अनुकूल पडले आहे. त्यामुळे सत्ताधारी गटात अस्वस्थता दिसली. सत्ता असूनही महत्त्वाचे पद मिळत नसल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला. अनेक गावांमध्ये आरक्षण पडलेल्या प्रवर्गातील एकच उमेदवार असल्याने गुलालाची उधळण करत सरपंचपदाच्या उमेदवाराच्या मिरवणुका काढण्यात आल्या. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे