खंडाळ्यात 63 कर्मचारी करणार मतमोजणी; 50 गावांसाठी होणार सात फेऱ्या

Satara Latest Marathi News Satara Politics News
Satara Latest Marathi News Satara Politics News

खंडाळा (जि. सातारा) : येथील 50 ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीसाठी तयारी पूर्ण झाली आहे. त्यासाठी निवडणूक अधिकारी तहसीलदार दशरथ काळे, नायब तहसीलदार वैभव पवार व सौ. साळी यांच्या नियंत्रणाखाली 21 टेबल असतील. प्रत्येक टेबलावर तीन कर्मचारी असे 63 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. 

तालुक्‍यातील एकूण 698 उमदेवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले. उद्या (ता. 18) मतमोजणीनंतर गावांत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. ही मतमोजणी सकाळी आठ वाजता येथील किसन वीर सभागृहात सुरू होईल. त्यासाठी सात फेऱ्या होणार आहे. त्या पुढीलप्रमाणे : पहिली फेरी- पाडेगाव, वाठार बुद्रुक, बोरी, सुखेड, मरिआईचीवाडी, लोणी, पिंपरी बुद्रुक. दुसरी फेरी- बावकलवाडी, पाडळी, निंबोडी, बाळूपाटलाचीवाडी, खेड बुद्रुक, अंदोरी, पिसाळवाडी व धनगरवाडी. 

तिसरी फेरी- कोपर्डे, नायगाव, तोंडल, शेखमिरेवाडी, गुठाळे, सांगवी, शेडगेवाडी, भाटघर, मिरजे, झगलवाडी व अंबारवाडी. चौथी फेरी- वडगाव, भोळी, राजेवाडी, वाघोशी, कवठे, अतिट व शिंदेवाडी. पाचवी फेरी- म्हावशी, कर्नवडी, लोहोम, धावडवाडी, भादे, विंग व केसुर्डी. सहावी फेरी- अजनूज, जवळे, भादवडे, मोर्वे, घाटदरे, शिवाजीनगर, पारगाव व कण्हेरी. सातवी फेरी- बावडा व अहिरे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com