Gram Panchayat Election : खंडाळा तालुक्‍यात 'महिलाराज'; तब्बल 84 महिलांची बिनविरोध निवड

अशपाक पटेल | Thursday, 14 January 2021

खंडाळा तालुक्‍यातील 57 ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

खंडाळा (जि. सातारा) : तालुक्‍यातील 57 ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तालुक्‍यात अंशतः व पूर्णतः बिनविरोध म्हणून एकूण 131 सदस्य ग्रामपंचायतींवर गेले आहेत. त्यामध्ये 84 महिलांनी बाजी मारली असून, 47 पुरुषांचा समावेश आहे. (Gram Panchayat Election)

हरळी ग्रामपंचायतीत राहुल कांतिलाल निकम, उज्वला शंकर शिंदे, अनिल शिवाजी बरकडे, अर्चना सुनील शिंदे, पूनम सतीश बरकडे, संजय आनंदा जावळे व ललिता हणमंत शिंदे अशा सात सदस्यांच्या बिनविरोध निवडी झाल्या आहेत. घाडगेवाडी येथे विद्या नवनाथ झणझणे, सिंधू विलास जाधव, रूपाली राजेंद्र घाडगे, संतोष नंदकुमार चौधरी व हिरालाल यशवंत घाडगे यांच्या बिनविरोध निवडी झाल्या आहेत. 

पिंगळीत स्थानिक नेतृत्वाचा लागणार कस; नऊ जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात

Advertising
Advertising

लिंबाचीवाडी येथे विद्या विक्रम मांढरे, कावेरी सागर कासुर्डे, अशोक रघुनाथ मांढरे, पूनम संतोष मांढरे, आदिनाथ मारुती मांढरे, जितेंद्र धोंडिबा ढेबे व सीताबाई शिवाजी कासुर्डे, तर राजकीय दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या पळशी येथे हेमा हनुमंत गायकवाड, कविता किरण राऊत, गजानन बबन भरगुडे, सुजित महादेव दगडे, नूतन शेखर चव्हाण, एकनाथ संपत भरगुडे, कमल अरुण भोसले, माधुरी कुंदन गोळे, नवनाथ अंकुश भरगुडे यांच्या बिनविरोध निवडी झाल्या आहेत. कान्हवडी येथे 
किरण लक्ष्मण केदारे, उज्वला निलेश भोसले, रमेश जगन्नाथ मरगजे, ज्योती नारायण सुतार, कविता सनी मरगजे, आशा विठ्ठल वीर, कृणाल रामदास मरगजे यांच्या बिनविरोध निवडी झाल्या आहेत. याप्रमाणेच वाण्याचीवाडी व कराडवाडी येथे बिनविरोध निवडी झाल्या आहेत. 

नागठाणेत ग्रामपंचायतीची रणधुमाळी शिगेला; सोशल मीडियावरही निवडणुकीचे पडसाद

संपादन : बाळकृष्ण मधाळे