'कृषी'ला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, मोदी सरकारला पळवाट : माजी मुख्यमंत्र्यांची टीका

सचिन शिंदे | Wednesday, 13 January 2021

सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायदे स्थगित करुन मोदी सरकारला दणका दिला असल्याचे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्याला स्थगिती देवून केंद्र सरकारला धक्का दिला आहे. मात्र, त्याच्या घटनात्मक वैधतेबद्दल भाष्य करणे अपेक्षित होते, ते झाले नाही. त्यामुळे मोदी सरकारला दिलेली ही पळवाट तर नाही ना?, अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना केली आहे. 

कृषी कायद्याच्या स्थगितीबद्दल आमदार चव्हाण यांनी आज ट्विट करून माहिती दिली. त्यामध्ये आमदार चव्हाण यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायदे स्थगित करुन मोदी सरकारला दणका दिला आहे. शेतकऱ्यांना जरी तात्पुरता दिलासा असला, तरी हा कार्यपालिकेच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप वाटतो.

शिवेंद्रसिंहराजेंसह समर्थकांना न्यायालयात मिळाला दिलासा

Advertising
Advertising

कोर्टाने ह्या कायद्यांच्या घटनात्मक वैधतेबद्दल भाष्य करणे अपेक्षित होते. ही मोदी सरकारला दिलेली पळवाट तर नाही ना, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. सर्वोच्च न्यायालयाने काल (मंगळवार) किसान कायद्यावर जो निर्णय देऊन केंद्र सरकारला फटकारले आहे. त्याचे आमदार चव्हाण यांनी कौतुक केले असले, तरी दुसरीकडे शंकाही व्यक्त केल्याने त्याची चर्चा आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे