कृष्णा काठावरील मनोमिलनानं बदललं राजकारण; कार्वेत ऐतिहासिक सत्तांतराची पुनरावृत्ती शक्य?

अमोल जाधव | Tuesday, 12 January 2021

राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या कार्वे गावावर 35 वर्षे एल. वाय. पाटील यांची निर्विवाद सत्ता होती. कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम केले. मात्र, 2000 मध्ये तरुणांनी एकत्रीत सत्तांतर घडवले.

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : कॉंग्रेसचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माजी आमदार (कै.) संभाजीराव थोरात, के. के. थोरात, एल. वाय. पाटील अशा दिग्गजांच्या कार्वे गावातील निवडणूक लक्षवेधी ठरते आहे. 20 वर्षापूर्वी एल. वाय. यांच्या 35 वर्षांच्या सत्तेचा बुरूज तरुणांनी एकत्रीत येत उलथवून लावला होता. त्यानंतर दहा वर्षे हा गट सत्तेपासून दूर होता. मात्र, पुन्हा पाटील गटाने सत्ता काबीज केली. यंदा पुन्हा दोन्ही गट आमने-सामने आहेत. त्यामुळे त्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या कार्वे गावावर 35 वर्षे एल. वाय. पाटील यांची निर्विवाद सत्ता होती. कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम केले. मात्र, 2000 मध्ये तरुणांनी एकत्रीत सत्तांतर घडवले. माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर गटातील के. के. थोरात गटाची उघड साथ घेत तरुणांनी सत्तांतर केले. कृष्णा काठावरील मोहिते-भोसले गटाच्या मनोमिलनाने राजकारण बदलले.

राणंद ग्रामपंचायतीत कॉंटे की टक्कर; आमचं ठरलंय विरुद्ध भाजपात जोरदार रस्सीखेच

Advertising
Advertising

उंडाळकर व एल. वाय. पाटील गट एकत्रीत आल्याने पुन्हा पाटील गटाने सत्ता काबीज केली. पाटील गटाकडून चार वर्षे सरपंच राहिलेल्या वैभव थोरात यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून केलेल्या विकासाच्या बाजूवर विरोधी गटाशी हातमिळवणी करत मागील निवडणुकीत पाटील गटाला आव्हान दिले. पण, त्यात विरोधकांना अपयश आले. यंदा विरोधकांनी एकजूट करत एल. वाय. पाटील गटाच्या सत्तेपुढे आव्हान दिले आहे. पाटील गटाचे धर्मराज एल. वाय. पाटील श्री सिद्धेश्वर पॅनेल विरुद्ध श्री धानाईदेवी यशवंत पॅनेल दुरंगी लढत आहे. ऐतिहासिक सत्तांतराची पुनरावृत्ती होणार का, याचीच प्रतीक्षा आहे.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे