esakal | ‘How’s The Josh’! सातारा जिल्ह्यातील शेतकरी कन्या सैन्य दलात; 'आसाम रायफल'मध्ये निवड
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News Satara News

कोल्हापूरला शारीरिक फिटनेस परीक्षेत शिल्पा यशस्वी ठरली. उरण येथे लेखी परीक्षा, तर पुण्यात मेडिकल झाले.

‘How’s The Josh’! सातारा जिल्ह्यातील शेतकरी कन्या सैन्य दलात; 'आसाम रायफल'मध्ये निवड

sakal_logo
By
सूर्यकांत पवार

कास (जि. सातारा) : जावळी तालुक्‍यातील दुर्गम भागातील गांजे गावच्या कन्येची भारतीय सैन्य दलाच्या आसाम रायफलमध्ये निवड झाली आहे. जावळी तालुक्‍यातील या युवतीने सैन्य दलात भरती होण्याचा मान मिळवल्याने ती तालुक्‍यातील पहिली महिला सैनिक ठरली आहे. शिल्पा पांडुरंग चिकणे असे या युवतीचे नाव. 

मेढ्याच्या दक्षिणेला गांजे गाव आहे. पांडुरंग चिकणे व आई पार्वती यांची ती मुलगी. या शेतकरी दापंत्याला एकूण सहा मुली. त्यातील शिल्पाचे सैन्य दलात भरती होण्याचे ध्येय होते. त्या दृष्टीने तिने बारावीनंतर खडतर परिश्रमाला सुरुवात केली. जावळी करिअर ऍकॅडमीमध्ये संतोष कदम यांच्याकडे तिने कठोर मेहनत घेतली. संतोष कदम यांनीही घरची परिस्थिती लक्षात घेऊन शिल्पाला एक रुपयाही फी न घेता दत्तक घेतले. घरच्या हलाखीच्या परिस्थितीचा बाऊ न करता तिने परिस्थितीशी लढत मेहनत घेतली. हे करतच आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयामध्ये शिक्षण सुरू ठेवले. 

यशवंतरावांच्या आत्मचरित्रातील कृष्णा-कोयना अनुभवण्यासाठी सुप्रिया सुळे थेट प्रीतिसंगमावर

सध्या ती बीकॉमच्या तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे. भारतीय सैन्य दलात जागा निघाल्यानंतर तिने फॉर्म भरला. कोल्हापूरला शारीरिक फिटनेस परीक्षेत ती यशस्वी ठरली. उरण येथे लेखी परीक्षा, तर पुण्यात मेडिकल झाले. या तीनही ठिकाणी चांगल्या पद्धतीने यश मिळाल्यावर आजच तिला "आसाम रायफल'मध्ये निवड झाल्याचे समजल्यानंतर चिकणे कुटुंबीय आनंदून गेले. ही बातमी गावात व परिसरात समजल्यानंतर लोकांनी धाव घेऊन तिच्या परिश्रमाचे कौतुक करत अभिनंदन केले.

निवडणुकीसाठी 100 कोटी खर्च करू, तुम्हाला मंत्रीपद देऊ; भाजपची राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला ऑफर

सैन्य दलात जायचेच हेच ध्येय ठेऊन प्रामाणिक प्रयत्न केल्याने यश मिळाले. त्यामध्ये कुटुंबातील सर्वांनीच प्रोत्साहन दिल्याने आज माझे स्वप्न पूर्ण झाले. 
-शिल्पा चिकणे, गांजे (ता. जावळी) 

जागतिक हस्ताक्षर दिन विशेष! हस्ताक्षराची गोडी, जगाशी नाते जोडी..

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top