
सातारा : PUC तपासणी महागली
सातारा : वाहनांची पीयूसी (पोल्यूशन अंडर कंट्रोल) तपासणी करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दरात नुकतीच वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांना आता पीयूसीसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. याआधी दुचाकीसाठी ३५ रुपये दर आकारण्यात येत होता. या दरात वाढ होऊन ती आता ५० रुपये करण्यात आली आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी १२५ रुपये, तर डिझेल वाहनासाठी १५० रुपये मोजावे लागणार आहेत.
केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या आदेशानुसार पीयूसी यंत्रणा ऑनलाइन केली आहे. त्यामुळे पीयूसी केंद्र चालकांना वाहनधारकांसाठी कॅमेरा, इंटरनेट आदी तांत्रिक उपकरणांची सोय करावी लागत असून, ही प्रक्रिया खर्चिक आहे. त्याशिवाय राज्यात २०११ पासून पीयूसी दरात दरात वाढ करण्यात आली नव्हती. परिणामी, केंद्र चालकांना आर्थिक फटका सहन करावा लागत होता. केंद्र चालकांकडून करण्यात येणारी मागणी व मागील दहा वर्षांपासून न वाढविलेले दर या पार्श्वभूमीवर पीयूसीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. याबाबत राज्य परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी आदेश काढले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना आता पीयूसीसाठी जादा रक्कम मोजावे लागणार आहे. राज्यात मागील काही वर्षांत पीयूसी केंद्र चालकांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे दरवाढ करण्याबाबत संघटनांनी यापूर्वी वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला होता. याबाबत अनेकदा बैठकही झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता पीयूसी दरवाढ
Web Title: Satara Puc Inspection More Expensive
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..