सातारा- पुणे मार्गावर भीषण अपघात; १५ वर्षांच्या मुलासह दोघांचा मृत्यू, ५ जखमी | Satara Pune Highway accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Accident

सातारा- पुणे मार्गावर भीषण अपघात; १५ वर्षांच्या मुलासह दोघांचा मृत्यू, ५ जखमी

Satara Pune Highway Accident

सातारा- पुणे महामार्गावर पारगाव येथे भरधाव ट्रकने कारला धडक दिल्याची घटना बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खंडाळा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पारगाव येथे रस्त्यालगत चहाची टपरी असून बुधवारी रात्री काही प्रवासी तिथे चहा पिण्यासाठी थांबले होते. तिथून जाणाऱ्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रकने टपरीजवळ थांबलेल्या एका कारला धडक दिली. यानंतर ट्रकने तिथे थांबलेल्या आणखी काही वाहनांना धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा अपघात ऐवढा भीषण होता की कारमधील दोन प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये १५ वर्षांचा मुलगा आणि एका महिलेचा समावेश आहे. दोघेही शिरुरमधील वडगाव रासई येथील रहिवासी असल्याचे समजते. या अपघातात एकूण पाच जण जखमी झाले असून ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अपघाताचे वृत्त समजताच खंडाळा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Sataraaccident