"येथे' सापडला अर्धा किलोचा दुर्मिळ प्रजातीचा झिंगा

अनिल घाडगे | Thursday, 30 July 2020

कोरेगाव तालुक्‍यातील तारगावामध्ये कृष्णा नदीपात्रात मासेमारी करताना अर्धा किलोचा झिंगा सापडला आहे. इंडो पॅसिफिक परिसरात दक्षिणपूर्व आशिया खंडात आणि ऑस्ट्रेलियाचा उत्तरेकडील भागात हा झिंगा सापडतो. 

शिरवडे (जि. सातारा) ः तारगाव (ता. कोरेगाव) येथे मासेमारी करणाऱ्या व्यक्तीस विशिष्ट दुर्मिळ प्रजातीचा झिंगा सापडला आहे. 

तारगाव येथील कृष्णा नदीत साधारण तीन फूट लांबीचा झिंगा प्रजातीचा जलचर आढळला. लांब मिशा, निळ्या नांग्या, पारदर्शक पोट अशी वैशिष्ट्ये पाहून तारगाव येथील विकास दिलीप थोरात यांनी कोपर्डे पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. अनिल घाडगे यांच्याशी संपर्क साधला. अधिक माहिती घेतल्यानंतर या झिंगा प्रजातीची माहिती मिळाली. हा जलचर फार दुर्मिळ आढळतो. त्याचे शास्त्रीय व स्थानिक नाव "मॅक्रोब्राशिअम रोझेनबर्गी' (Macrobrachium rosenbergii) आहे. यालाच "जायंट प्रॉन' (giant river prawn) किंवा (giant freshwater prawn, palaemonid freshwater prawn) असेही म्हटले जाते. या झिंग्याच्या विक्रीसाठी चांगली किंमत असते. इंडो पॅसिफिक परिसरात दक्षिणपूर्व आशिया खंडात आणि ऑस्ट्रेलियाचा उत्तरेकडील भागात हा झिंगा सापडतो. अशी प्रजाती आपल्याकडे सापडणे फार दुर्मिळ आहे. 

अशा प्रकारचा झिंगा पाहून उत्सुकता वाढली. त्याची पैदास अजून सापडण्याची शक्‍यता आहे. मत्स्य व्यवसाय विभागाने दखल घेणे गरजेचे वाटते. 

विकास थोरात, तारगाव (ता. कोरेगाव) 

(संपादन ः संजय साळुंखे) 

 

SSC Result : सातारा जिल्ह्यातील 38 हजार 688 विद्यार्थीं यशस्वी ; तुमच्या तालुक्याचा निकाल पाहा